ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी यातील कशाने जास्त फायदा होतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 09:58 AM2019-12-14T09:58:46+5:302019-12-14T10:05:50+5:30

काही लोकांना चहा पसंत असतो तर काही लोकांना कॉफी पसंत असते. असे कमीच लोक असतील ज्यांना कॉफी आणि चहा दोन्ही आवडतं.

Black tea vs black coffee know which one is beneficial for health | ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी यातील कशाने जास्त फायदा होतो?

ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी यातील कशाने जास्त फायदा होतो?

googlenewsNext

(Image Credit : seriouseats.com)

काही लोकांना चहा पसंत असतो तर काही लोकांना कॉफी पसंत असते. असे कमीच लोक असतील ज्यांना कॉफी आणि चहा दोन्ही आवडतं. काही लोक ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅट टी सेवन करतात. पण प्रश्न यातील फायदेशीर काय आहे? असाही प्रश्न अनेकांना पडतो. अलिकडे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे कॉफीच्या सेवनाने शरीराला वेगवेगळे फायदे होतात. आता जाणून आता जाणून घेऊन ब्लॅक कॉफी फायदेशीर आहे की ब्लॅट टी.... 

ब्लॅक टी चे फायदे

(Image Credit : parenting.firstcry.com)

ब्लॅक टी हिवाळ्यात तुम्हाला गरम ठेवते. याने शरीराला भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात त्यामुळे इम्यूनिटी बूस्ट होते. तसेच ब्लॅक टी मध्ये पॉलिफेनॉल्स असतात जे तुमच्या सिस्टीममध्ये केमिकल्स जाण्यापासून रोखणारे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. पॉलिफेनॉल्स प्लाक तयार करणाऱ्या बॅक्टेरियापासून तुमचा बचाव करतात. ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. इतकेच काय तर तुमचा ओवेरियन कॅन्सरपासूनही बचाव होतो. तसेच यात टॅनिन्स असतात. यानेही इम्यूनिटी चांगली राहते आणि इंटेस्टाइन मजूबत होतात. चहात कॉफीच्या तुलनेत अर्धच कॅफीन असतं.

ब्लॅक कॉफीचे फायदे

ब्लॅक कॉफी जिमला जाणाऱ्या लोकांना अधिक पसंत असते. पण ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी नुकसानकारक मानली जाते. मात्र, योग्य प्रमाणात ब्लॅक कॉफीचं सेवन केल्यास याचे काही फायदेही आहेत. ब्लॅक कॉफीने आयुष्य वाढतं असा दावा केला जातो. यातही अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात सोबतच पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमही असतं. ब्लॅक टी प्रकिन्सस डिजीज, बेसल सेल कार्सिनोमा, ऐल्टशाइमर्स आणि डायबिटीस, पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर आणि महिलांमध्ये एंडोमेट्रिअल कॅन्सरपासून बचाव करतात.

काय आहेत फायदे

(Image Credit : scoopwhoop.com)

मुळात हे यावर अवलंबून आहे की, तुम्हाला कोणते फायदे हवे आहेत. दोन्हींचे वेगवेगळे फायदे आहेत. फक्त फरक एकच आहे तो म्हणजे कॅफीनच्या प्रमाणात फरक. कॉफीमध्ये चहापेक्षा दुप्पट कॅफीन असतं. त्यामुळे जर सकाळी उठून तुम्हाला झोप उडवायची असले तर कॉफी सेवन करू शकता. जर दिवसभराचा थकवा दूर करायचा असेल तर तुम्ही चहाची निवड करू शकता.


Web Title: Black tea vs black coffee know which one is beneficial for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.