तुम्हीही ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिता का? किडनीचं होऊ शकतं मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:22 AM2023-07-04T11:22:20+5:302023-07-04T11:22:36+5:30

Black Tea With Vitamin C: ज्या लोकांना दूध आणि साखरेच्या चहाचा धोका माहीत आहे ते लोक सामान्यपणे ब्लॅक टी चं सेवन करतात. काही लोक तर त्यात लिंबूही टाकतात. लिंबामधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं.

Black tea with lemon vitamin c combination daily can affects your kidney function | तुम्हीही ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिता का? किडनीचं होऊ शकतं मोठं नुकसान

तुम्हीही ब्लॅक टीमध्ये लिंबू टाकून पिता का? किडनीचं होऊ शकतं मोठं नुकसान

googlenewsNext

Black Tea With Vitamin C: भारतात चहा पिण्याऱ्यांची कमतरता नाही. पाण्यानंतर सगळ्यात जास्त सेवन केलं जाणारं पेय म्हणजे चहा आहे. बरेच लोक दिवसातून अनेक कप चहा पितात. हेल्थ एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, दूध आणि साखरेचं जास्त सेवन केल्याने डायबिटीस आणि पोटासंबंधी समस्या वाढतात. त्यामुळे बरेच लोक पर्याय म्हणून काळा चहा पितात. पण खरंच काळा चहा सुरक्षित आहे का?

ब्लॅक टी आणि लिंबूचं कॉम्बिनेशन

ज्या लोकांना दूध आणि साखरेच्या चहाचा धोका माहीत आहे ते लोक सामान्यपणे ब्लॅक टी चं सेवन करतात. काही लोक तर त्यात लिंबूही टाकतात. लिंबामधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं. ज्याने इम्यूनिटी बूस्ट होते. हेच कारण आहे की, कोरोना काळात लोक लिंबाचा काढा पित होते. पण याने नेहमीच फायदा होईल असंही नाही.

किडनीला होईल नुकसान

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या एका रिपोर्टनुसार, मुंबईतील एका रूग्णाच्या पायावर सूज आली, त्याशिवाय उलटी होणे आणि भूकही कमी लागत होती. टेस्टमधून समोर आलं की, त्याची किडनी बरोबर काम करत नाहीये. जेव्हा त्याची डाएट हिस्ट्री काढण्यात आली. तेव्हा समजलं की, रूग्ण ब्लॅक टी सोबत व्हिटॅमिन सी चं सेवन करत होता. असे बरेच लोक आहेत जे लिंबूचा काढा पिऊन किडनीला नुकसान पोहोचवत आहेत. 

वेळीच व्हा सावध

जे लोक लिंबाच्या काढ्याचं जास्त प्रमाणात सेवन करतात त्यांचं केरेटिनाइन वाढतं. ज्याची लेव्हस सामान्यपणे 1 च्या खाली असली पाहिजे. किडनीचं काम शरीरातील तरल पदार्थांमधील विषारी पदार्थ स्वच्छ करणं आणि बाहेर काढणं. जर यात काही गडबड झाली तर याचा प्रभाव पूर्ण शरीरावर बघायला मिळतो.

जास्तीत जास्त हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, कोणत्याही गोष्टीचं सेवन जास्त केलं तर आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच कमी प्रमाणात काढा प्यावा. जर व्हिटॅमिन सी चं सेवन वाढलं तर शरीरात ऑक्सिलेटचं प्रमाण वाढतं. जे किडनी इन्फेक्शन आणि किडनी फेलिअरचं कारण बनू शकतं.

Web Title: Black tea with lemon vitamin c combination daily can affects your kidney function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.