'पी हळद अन् हो गोरी' ही म्हण ऐकली असेलच; पण काळ्या हळदीचे फायदे माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 10:58 AM2023-12-27T10:58:09+5:302023-12-27T10:59:09+5:30
काळ्या हळदीचेही आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदानुसार, हळदीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण ते अनेकांना माहीत नसतात.
Black turmeric Benefits : हळद आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. सामान्यपणे सगळ्याच किचनमध्ये पिवळ्या रंगाची हळद पावडर वापरली जाते. याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदानुसार, हळदीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण ते अनेकांना माहीत नसतात.
काळी हळद
इतकंच नाही तर जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नाही की, हळदीचे प्रकारही असतात. हळद फक्त पिवळ्या रंगाची नसते. एक काळी हळदही असते. पण ही हळद पूर्ण काळी नसून काळ्या आणि निळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये असते.
काळी हळद सामान्यपणे भारताच्या पूर्वोत्तर भागात आणि मध्य प्रदेशात उगवली जाते. काळ्या हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात अॅंटीऑक्सीडेंट असतात. या हळदीला वैज्ञानिक भाषेत Curcuma caesia असं नाव आहे.
काळ्या हळदीचे फायदे
काही रिसर्चनुसार, ही हळद आयुर्वेदातील महत्वाच्या जडीबुटींपैकी एक आहे. यात अनेक प्रकारचे औषधी गुण आढळून येतात. ज्यात अॅंटीफंगल, अॅंटी अस्थमा, अॅंटीऑक्सीडेंट, एनाल्जेसिक, लोकोमोटर, डिप्रेसेंट, अॅंटीकॉन्वेलसेंट, अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी अल्सर, मासपेशींना आराम, चिंता आणि डिप्रेशन दूर करणारे गुण प्रामुख्याने आढळतात. तसेच अनेक आजारांमध्येही उपयोगी पडते.
श्वासासंबंधी समस्या होतात दूर
असं सांगितलं जातं की, श्वासासंबंधी आजारांमध्ये काळी हळद फार फायदेशीर असते. यात अॅंटी इंफ्लेमेट्री गुण असतात. जे सर्दी, खोकला, अस्थमासारख्या आजारांपासून आराम देतात. महत्वाची बाब म्हणजे याचा वापर तुम्ही पिवळ्या हळदीसारखाच करू शकता.
मायग्रेनमध्ये उपयोगी
मायग्रेनची समस्या जास्तकरून महिलांमध्ये बघायला मिळते. पण हा आजार कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. यात डोक्याच्या मागे एका भागात असह्य वेदना होतात. मायग्रेनने पीडित व्यक्ती मोठा आवाज आणि प्रकाशाने संवेदनशील होतो. काळी हळद या समस्येत आराम देऊ शकते. आरामासाठी ताज्या हळदीचा लेप तयार करून कपाळावर लावा.
अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य वेदनांचा सामना करावा लागतो. अशात काळ्या हळदीतील अॅंटी इनफ्लेमेट्री गुण आराम देतात. यासाठी गरम दुधात काळ्या हळदीचं पावडर मिश्रीत करून पिण्याचा सल्ला देतात.
गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका
काळी हळद गॅस्ट्रिक समस्यांपासून सुटका मिळवून देण्याचं काम करते. अॅसिड रिफ्लक्स, गॅस, सूज, उचकी, अपचन, अल्सर, गॅस्ट्रिक इश्यू आहे. अनेक रूटीन बिघडल्याने आणि खाण्या-पिण्यामुळे ही समस्या होते. यापासून सुटका मिळवण्यासाठी काळ्या हळदीचं योग्य प्रमाणात सेवन पाण्यासोबत करावं.