पॅलेट गनमुळे अंधत्व आलेल्यांना मिळाली दृष्टी जळगावातील डॉक्टरांचा पुढाकार : काश्मिरात बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे मोफत शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2016 11:37 PM2016-07-29T23:37:54+5:302016-07-29T23:37:54+5:30
जळगाव : काश्मीरमध्ये पॅलेट गनच्या मार्यातून डोळ्यांना होणार्या गंभीर इजांमुळे अंधत्व आलेल्या रुग्णांवर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे मोफत शस्त्रक्रिया केली जात असल्याने रग्णांना नवीन दृष्टी मिळत आहे. विशेष म्हणजे यासाठी जळगावातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्यामुळे देशातील विविध भागातील डॉक्टर काश्मीरमध्ये पोहचून तेथे मोफत सेवा देत आहे. तीन दिवसात तेथे ५० यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
ज गाव : काश्मीरमध्ये पॅलेट गनच्या मार्यातून डोळ्यांना होणार्या गंभीर इजांमुळे अंधत्व आलेल्या रुग्णांवर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनतर्फे मोफत शस्त्रक्रिया केली जात असल्याने रग्णांना नवीन दृष्टी मिळत आहे. विशेष म्हणजे यासाठी जळगावातील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्या या कार्यामुळे देशातील विविध भागातील डॉक्टर काश्मीरमध्ये पोहचून तेथे मोफत सेवा देत आहे. तीन दिवसात तेथे ५० यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सध्या काश्मिरात परिस्थिती गंभीर बनल्याने दगडफेकीसारखे प्रकार घडत आहे. यासोबतच पॅलेटगनद्वारे मारा केल्याने छर्रे डोळ्यात जाऊन डोळ्यांना गंभीर इजा होत आहे. या हल्ल्यामुळे डोळ्याला न सुधारणारा धोका उद्भवतो. अशा परिस्थितीत छर्रा आतच राहिला तर डोळ्याची स्थिती नाजूक होते किंवा छर्रा काढला तरी जखम कायम राहून नजर कमी होऊ शकते. हे ओळखून रुग्णांचे हे अंधत्व टाळण्यासाठी जळगावातील नेत्ररोगतज्ज्ञ तथा महाराष्ट्र राज्य नेत्ररोग संघटनेचे सहसचिव, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे संघटक डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी देशभरातील रेटीनल सर्जन (डोळ्याच्या मागील पडद्याची शस्त्रक्रिया) यांना सोशल मीडियाद्वारे काश्मिरात या शस्त्रक्रिया करण्यासाठी विनंती केली. त्यास देशभरातून लगेच प्रतिसाद मिळून ठिकठिकाणचे डॉक्टर तेथे जाण्यास तयार झाले. यामध्ये मुंबईच्या आदित्यज्योत हॉस्पिटलचे संचालक डॉ. एस. नटराजन, सैयद असगर हुसेन (चेन्नई), डॉ. केंगशू मारवाह (दिल्ली) यांनी तेथे जाऊन गेल्या तीन दिवसात ५० मोफत शस्त्रक्रिया केल्या. त्या पाठोपाठ सांगली येथील डॉ. गौरव परांजपे, औरंगाबाद येथील डॉ. आशीष होलानी हेदेखील श्रीनगर येथे पोहचले आहेत. या सर्वांचे, इतर खर्च या सर्वांची जबाबदारी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनने घेतली असून यात शासनाचा कोणताच संबंध नाही. डोळ्यांना इजा झालेल्या रुग्णांची संख्या पाहता आणखी तीन डॉक्टरांची टीम संघटनेमार्फत तयार ठेवली असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. शिबिरातील डॉक्टरांना श्रीनगर येथे नेण्याची तसेच सुरक्षेची जबाबदारी फाउंडेशनचे प्रकल्प प्रमुख ऋषिकेश परमार हे पाहत आहे. संस्थापक अदिक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. ----काश्मीरमध्ये पॅलेटगनमुळे नजर गेलेल्यांवर बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या पुढाकाराने डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेमुळे अनेकांची आपण दृष्टी वाचवू शकलो, याचे मोठे समाधान आहे. -डॉ. धर्मेंद्र पाटील, संघटक, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन.