या खास ड्रिंकच्या मदतीने पोट फुगणं आणि गॅसची समस्या लगेच सोडवा, जाणून घ्या उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 03:33 PM2024-01-05T15:33:46+5:302024-01-05T15:37:42+5:30

या मसाल्यांपासून तयार हर्बल टी ब्लोटिंग (Bloating) पासून लगेच सुटका मिळवून देते. चला जाणून घेऊ उपाय.

Bloating home remedies drinks to get rid of bloating | या खास ड्रिंकच्या मदतीने पोट फुगणं आणि गॅसची समस्या लगेच सोडवा, जाणून घ्या उपाय

या खास ड्रिंकच्या मदतीने पोट फुगणं आणि गॅसची समस्या लगेच सोडवा, जाणून घ्या उपाय

Healthy Drinks: काही मसालेदार, तळलेले पदार्थ खाल्ल्यावर पोट फुगण्याची समस्या होते. पोट जरा जास्त फुगतं आणि पोटात गॅसही बनू लागतो. मात्र, ही समस्या दूर करण्यासाठी घरातील काही मसाल्यांचा वापर करू शकता. या मसाल्यांपासून तयार हर्बल टी ब्लोटिंग (Bloating) पासून लगेच सुटका मिळवून देते. चला जाणून घेऊ उपाय.

पोट फुगण्याच्या मुख्य कारणांमध्ये फायबर, फॅट्स आणि सोडिअम असलेल्या पदार्थांचा समावेश असतो. तसेच तुम्ही जेवण स्कीप करता आणि अवेळी काही खात असाल तर पोट फुगण्याची समस्या होते.

ओव्याचं पाणी

ओव्याच्या पाण्यामुळे पोट फुगण्याची समस्या लगेच दूर होते. अर्धा कप पाणी एका भांड्यात गॅस शेगडीवर ठेवा आणि अर्धा चमचा ओवा टाकून शिजवा. काही वेळाने पाण्याचा रंग बदलला की, पाणी पिण्यासाठी तयार झालं आहे. हे पाणी गाळून सेवन करा. काही वेळातच पोटाला आराम मिळतो.

बडीशेपचं पाणी

पोटाला थंडावा आणि आराम मिळावा यासाठी बडीशेप फारच फायदेशीर असते. यामुळे पोटासंबंधी समस्या लगेच दूर होऊ शकते. बडीशेपचं पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप टाकून उकडा. उकडलेलं पाणी गाळून त्याचं सेवन करा. 

आल्याचं खास ड्रिंक 

आल्यामध्ये अ‍ॅंटी-इफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे पोटाच्या समस्या जसे की, अ‍ॅसिडिटी, गॅस, पोटदुखी, पोट फुगणं आणि मळमळ या समस्या दूर होतात. एक ग्लास पाण्यात थोडं आलं टाकून उकडा. त्यात काही लिंबाच्या रसाचे थेंब टाका आणि सेवन करा. या पाण्याने ब्लोटिंगपासून सुटका मिळते आणि गॅसची समस्याही दूर होते.

Web Title: Bloating home remedies drinks to get rid of bloating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.