कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा जास्त धोका आणि का?, वाचा रिसर्च काय सांगतो....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 04:45 PM2021-03-12T16:45:15+5:302021-03-12T16:45:56+5:30

WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, आज जगभरात हृदयाशी संबंधित आजारांमुळेच लोकांना जास्त प्रमाणात जीव गमवावा लागतो.

THIS blood group is at a higher risk of heart attack: Study | कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा जास्त धोका आणि का?, वाचा रिसर्च काय सांगतो....

कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना असतो हार्ट अटॅकचा जास्त धोका आणि का?, वाचा रिसर्च काय सांगतो....

Next

सामान्यपणे हृदयरोग हे जास्त वयाच्या लोकांना होतात असा समज आतापर्यंत होता. पण आता तर कमी वयाच्या लोकांनाही हार्ट अटॅक येतात. हृदयरोग होतात. म्हणजे हार्ट अटॅकला वयाचं बंधन राहिलेलं नाही. अशात WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, आज जगभरात हृदयाशी संबंधित आजारांमुळेच लोकांना जास्त प्रमाणात जीव गमवावा लागतो. एका नव्या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, ज्या लोकांचा ब्लड ग्रुप 'O' नाहीये, त्यांना हृदयरोग होण्याचा धोका जास्त राहतो. 

नुकत्याच करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, ज्या लोकांचा ब्लड ग्रुप 'O' नाहीये. त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक राहतो. वैज्ञानिकांनी ४००,००० पेक्षा अधिक लोकांवर रिसर्च केला आणि यातून त्यांना आढळून आलं की, O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांच्या तुलनेत ब्लड ग्रुप A किंवा B असलेल्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका ८ टक्के जास्त राहतो. हा रिझल्ट अमेरिकन हार्ट असोसिएशन(AHA), मेडिकल जर्नल्स आर्टेरियोस्व्लेरोसिस, थ्रोम्बोसिस आणि वस्कुलर बायोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. (हे पण वाचा : हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...)

२०१७ मध्ये यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी द्वारे एक रिसर्च करण्यात आला होता. ज्यात १३ लाखांपेक्षा अधिक लोकांना सहभागी करून घेतलं होतं. या रिसर्चमधून समोर आलं की, नॉन O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना हार्ट अटॅकसहीत हृदयरोगांचा धोका ९ टक्के अधिक राहतो.

एका रिसर्चमध्ये वैज्ञानिकांनी ब्लड ग्रुप A आणि B ची तुलना ब्लड ग्रुप O सोबत केली. या रिसर्चमधून समोर आले की, O ब्लड टाइपच्या लोकांच्या तुलनेतून B ब्लड टाइप असलेल्या लोकांना मायोकार्डिअल इन्फ्रक्शन(हार्ट अटॅक)चा धोका १५ टक्के जास्त असतो. तेच ब्लड ग्रुप O च्या तुलनेत A ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना हार्ट फेल्यूरचा धोका ११ टक्के जास्त राहतो. हार्ट फेल्यूर आणि हार्ट अटॅक दोन्ही हृदयरोगांचं रूप आहे. पण हार्ट फेल्यूर हळूहळू होतो. जर हार्ट अटॅक अचानक येतो. अशात सांगितलं जातं की, हार्ट अटॅक काही काळाने हार्ट फेल होण्याचं कारण बनतो. (हे पण वाचा : घाईघाईत खाणं ठरू शकतं वजन वाढण्याचं कारणं; अन्न चावून खाल्यानं शरीराला 'असा' होतो फायदा)

यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीनुसार, ब्लड ग्रुप O च्या तुलनेत इतर ब्लड ग्रुप्समध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो कारण यात ब्लड क्लॉट किंवा रक्ताच्या गाठी बनण्याची शक्यता जास्त असते. २०१७ मध्ये करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये सांगण्यात आले की, O व्यतिरिक्त दुसऱ्या ब्लड ग्रुप्समध्ये नॉन-वीलब्रॅंड फॅक्टर(एक ब्ल़ड क्लॉट तयार करणारं प्रोटीन)चं कसंट्रेशन जास्त होतं. त्यामुळे नॉन O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका जास्त राहतो.

रिसर्चनुसार, ब्लड ग्रुप A आणि ब्लड ग्रुप B असलेल्या लोकांमध्ये थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गाठी तयार होण्याची शक्यता ४४ टक्के जास्त असते. रक्ताच्या गाठी कोरोनरी धमण्यांना ब्लॉक करतात आणि हृदयाच्या मांसपेशींना ऑक्सीजन व पोषक तत्वांपासून वंचित करतात. याने हार्ट अटॅकची वेळ येते
 

Web Title: THIS blood group is at a higher risk of heart attack: Study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.