या ब्लड ग्रुपला जास्त राहतो स्ट्रोकचा सर्वात जास्त धोका, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 03:36 PM2022-09-08T15:36:40+5:302022-09-08T15:38:13+5:30

Stroke Risk : कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना स्ट्रोकचा अधिक धोका राहतो. जर तुमचाही ब्लड ग्रुप रिसर्चमध्ये सांगण्यात आलेल्या ग्रुपपैकी आहे तर तुम्हाला सावध होणं फार गरजेचं आहे.

Blood group type could predict your stroke risk a blood group is at higher risk | या ब्लड ग्रुपला जास्त राहतो स्ट्रोकचा सर्वात जास्त धोका, वेळीच व्हा सावध

या ब्लड ग्रुपला जास्त राहतो स्ट्रोकचा सर्वात जास्त धोका, वेळीच व्हा सावध

googlenewsNext

Stroke Risk : स्ट्रोक एक अशी स्थिती आहे जी मेंदूचा रक्तप्रवाह थांबल्यावर निर्माण होते. ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे. ज्याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं तर जेव्हा मेंदूतील ब्लड वेसेल्स फाटतात आणि जास्त रक्त वाहू लागतं तेव्हा स्ट्रोकची स्थिती निर्माण होते. या स्थितीत व्यक्तीचा मृत्यूही होतो. नुकत्यात करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, कोणत्या ब्लड ग्रुपच्या लोकांना स्ट्रोकचा अधिक धोका राहतो. जर तुमचाही ब्लड ग्रुप रिसर्चमध्ये सांगण्यात आलेल्या ग्रुपपैकी आहे तर तुम्हाला सावध होणं फार गरजेचं आहे आणि आपल्या लाइफस्टाईलमध्ये सुधार करण्याचीही गरज आहे.

Dailymail नुसार, वैज्ञानिकांनी सांगितलं की, कोणत्याही व्यक्तीच्या ब्लड ग्रुपवरून स्ट्रोकचा धोका ओळखला जाऊ शकतो. अमेरिकन वैज्ञानिकांनी आनुवांशिक स्ट्रोक आणि इस्केमिक स्ट्रोकच्या अनेक रिसर्चचं विश्लेषण केलं. इस्केमिक स्ट्रोक तेव्हा येतो जेव्हा ब्लड क्लॉट मेंदूतील रक्त आणि ऑक्सिजनचा सप्लाय रोखू लागतो. हा स्ट्रोकचा सर्वात कॉमन प्रकार आहे. जो 10 पैकी 9 केसेसमध्ये आढळतो. 

वैज्ञानिकांना आढळून आलं की, ए ब्लड ग्रुप असलेल्या लोकांमध्ये इतर सर्व ब्लड ग्रुपच्या लोकांच्या तुलनेत 60 वयाच्या आधीच स्ट्रोकचा धोका 16 टक्के राहतो. ब्लड ग्रुपसोबतच लिंग, वजन आणि इतर कारणेही जबाबदार असतात. 

त्यासोबतच टाइप बी ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना स्ट्रोकचा धोका थओडा जास्त असतो. पण ब्लड ग्रुप ओ असलेल्या लोकांना सर्वात कमी धोका असतो. वैज्ञानिक म्हणाले की, काही ब्लड ग्रुपच्या लोकांसाठी हा धोका कमी होता आणि लोकांनी याची चिंता करू नये.

जर्नल न्यूरोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, मेरीलॅंड यूनिव्हर्सिटीच्या टीमने 7 हजार स्ट्रोक पेशेंट आणि वेगवेगळ्या रिसर्चमध्ये सहभागी 6 लाख लोकांच्या हेल्थची टेस्ट केली. त्यांना आढळलं की, O ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना 60 वयापेक्षा कमी वयात स्ट्रोकचा धोका 12 टक्के कमी होता. तेच बी आणि एबी ब्लड ग्रुप असलेल्या लोकांवर काही प्रभाव पडला नाही.

वैज्ञानिकांनी हेही सांगितलं की, टाइप ए ब्लड ग्रुप असणाऱ्या लोकांमध्ये दर 16 केसेसपैकी एक केस स्ट्रोकचं कारण त्यांच्या ब्लडला ठरवलं जाऊ शकतं. डॉ. स्वीवन किटनर यांच्यानुसार, लोकांमध्ये सुरूवातीची स्ट्रोकची लक्षणे बघितली जात आहेत. स्ट्रोकमुळे लोकांच्या मृत्यूचा अधिक धोका आहे आणि जे लोक वाटत आहेत, त्या लोकांमध्ये दिव्यांगता दिसून येते. चला जाणून घेऊन कोणत्या ब्लड ग्रुपला अधिक धोका असतो.

ओ पॉझिटिव्ह - 38 टक्के

ओ निगेटिव्ह - 7 टक्के

ए पॉझिटिव - 34 टक्के

ए निगेटिव्ह - 6 टक्के

बी पॉझिटिव्ह - 9 टक्के

बी निगेटिव्ह - 2 टक्के

एबी पॉझिटिव्ह - 3 टक्के

एबी निगेटिव्ह - 1 टक्के

Web Title: Blood group type could predict your stroke risk a blood group is at higher risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.