लो ब्लड शुगरमुळे होऊ शकता बेशुद्ध; जाणून घ्या अशावेळी काय कराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 03:03 PM2018-12-08T15:03:31+5:302018-12-08T15:07:15+5:30

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे रक्तातील साखर होय. ब्लड शुगर ब्रेन, हार्ट आणि डायजेस्टिव्ह सिस्टिमसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

Blood sugar may be reduced if unconscious know what to do immediatel | लो ब्लड शुगरमुळे होऊ शकता बेशुद्ध; जाणून घ्या अशावेळी काय कराल?

लो ब्लड शुगरमुळे होऊ शकता बेशुद्ध; जाणून घ्या अशावेळी काय कराल?

googlenewsNext

आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे रक्तातील साखर होय. ब्लड शुगर ब्रेन, हार्ट आणि डायजेस्टिव्ह सिस्टिमसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते तेव्हा याला हायपोग्लायमेसिया असं म्हणतात. शरीरातील साखरेचे प्रमाण जाणून घेण्यासाठी रक्तातील ग्लूकोजचे प्रमाण तपासण्यात येते. जाणून घेऊया रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याची लक्षणं आणि कारणांबाबत...

ही असू शकतात लक्षणं :

ब्लड शुगर कमी झाल्यामुळे अनेकदा चक्कर येते आणि व्यक्ती बेशुद्ध पडते. तसेच चिडचिड होते आणि मूडमध्येही सतत बदल होत राहतात. अनेकदा अस्वस्थ वाटण्यासोबतच अनेक वाईट विचार मनात येऊ लागतात.  

डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाले तर त्यांना डोकेदुखीचा सामना करावा लागतो. तसेच अशा व्यक्तींमध्ये हार्मोनल चेंजेसही दिसून येतात.

ब्लड शुगर कमी झाल्यामुळे अनेक छोट्या छोट्या गोष्टी करतानाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा एखादं काम करताना व्यक्ती गोंधळून जातात. तसेच डोळ्यांच्या समस्याही उद्भवतात. 

तुम्हाला सतत भूक लागत असेव तर हीदेखील लो ब्लड शुगरची लक्षणं आहेत. हा एक प्रकारचा शरीराने दिलेला संकेत असतो की, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होत आहे. याव्यतिरिक्त ब्लड शुगर कमी झाल्यामुळे अनेकदा गरम होतं. याचा परिणाम त्वचेवरही होतो. 

 हे उपचार करा :

- जर 'लो ब्लड शुगरची कोणतीही माइल्ड केस असेल तर लगेचचं एखादा गोड पदार्थ खाणं गरजेचं असतं. अमेरिकन डायबिटीज असोसिएशने सांगितल्यानुसार, जर तुमची ब्लड शुगर लेव्हल 70 मिग्रा/डेलीहून कमी झाली आणि तुम्ही शुद्धीवर असाल तर तुम्ही 15 ते 20 ग्रॅम ग्लुकोजचं सेवन करणं गरजेचं असतं. 

- कोणत्याही रूपामध्ये कार्बोहायड्रेटचं सेवन करू शकता. फक्त त्यामध्ये ग्लुकोज (फळांचा रस, चॉकलेट्स, मिठाई इत्यादी) असणं गरजेचं आहे. यापैकी काही पदार्थांना आपल्यासोबत नेहमी ठेवू शकता. 

- 15 मिनिटांनंतर पुन्हा आपलं ब्लड शुगर लेव्हल चेक करा. जर आत्ताही ब्लड शुगर लेव्हल कमी होत असेल तर पुन्हा काहीतरी गोड पदार्थ खा. 

- जेव्हा तुमचं शुगर लेव्हल सामान्य होईल त्यावेळी हायपोग्लायसीमिया पुन्हा होण्यापासून रोखण्यासाठी नाश्ता किंवा भरपूर जेवणं गरजेचं असतं. 

- ब्लड शुगर लेव्हल फार कमी झाल्यावर बेशुद्ध होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही स्वतःहून साखर घेऊ शकत नाही. तुम्हाला रिकव्हरीसाठी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची गरज लागू शकते. गंभीर हायपोग्लाइसीमिया (54 मिग्रा/डेलीपेक्षाही कमी) झाला असेल तर एखाद्या जवळच्या व्यक्तींकडून ग्लूकागॉनचं इन्जेक्शन घ्या. 

- ब्लड शुगर कमी झाल्यानंतर सर्व उपाय करूनही रूग्णामध्ये काहीही फरक जाणवत नसेल तर लगेचचं डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

Web Title: Blood sugar may be reduced if unconscious know what to do immediatel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.