बॉडी बिल्डिंगसाठी प्रोटीन पावडरचे अधिक सेवन करत आहात?; जाणून घ्या नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 02:27 PM2019-03-28T14:27:51+5:302019-03-28T14:28:48+5:30
सध्या अनेक लोक फिटनेस फ्रिक असतात. ते नेहमी प्रोटीन पावडरचा वापर करतात. शरीरामध्ये प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लोक प्रोटीन पावडरचा वापर करतात.
(Image Credit : 123RF)
सध्या अनेक लोक फिटनेस फ्रिक असतात. ते नेहमी प्रोटीन पावडरचा वापर करतात. शरीरामध्ये प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी लोक प्रोटीन पावडरचा वापर करतात. प्रोटीन पावडर दूध, बटर, केसिन आणि सोयापासून तयार करण्यात आलेली कोरडी पावडर असते. बॉडी बिल्डर आणि वर्कआउट करणाऱ्या व्यक्ती याचं जास्त सेवन करतात. यामध्ये ग्लोबुलर प्रोटीन असतात. जे द्रव्य स्वरूपात असतात. हे पदार्थ बायोडिग्रेशन प्रोडक्ट्सपासून तयार करण्यात येतात. तुम्हाला माहीत आहे का? हे ग्लोबुलर पदार्थ शरीराला फायदे पोहोचवण्याऐवजी नुकसान पोहोचवतात. जर तुम्ही वर्कआउट रूटिन फॉलो करत असाल, तर शरीराला आवश्यक तेवढं प्रोटीन पुरवणंही आवश्यक असतं. म्हणून यासाठी अनेक लोक प्रोटीन पावडरचा जास्तीत जास्त वापर करतात. असं करणं आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे प्रोटीन पाउडरचा वापर करण्याआधी आपल्या ट्रेनरकडून किंवा डाएटिशियनकडून सल्ला घेणं गरजेचं असतं. जाणून घेऊया प्रोटीन पावडरच्या अधिक सेवनाने शरीराला होणाऱ्या साइड इफेक्ट्सबाबत...
पिंपल्स येणं
प्रोटीन पावडरमध्ये अनेक प्रकारचे हार्मोन्स आणि बायोअॅक्टिव्ह पेप्टाइड्स असतात. जे सीबममध्ये वाढ करतात. सीबममध्ये वाढ झाल्याने त्वचेवर पिंपल्सची समस्या वाढते.
पोषक तत्वांची कमतरता
शरीरामध्ये पोषक तत्वांची कमतरता प्रोटीन पावडरच्या सततच्या सेवनाने होऊ शकते. जर तुम्ही अंडी, दूध आणि मांस यांसारख्या नैसर्गिक प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांचं सेवन करत असाल तर यामुळे शरीरातील इतर पोषक तत्वांची कमतरता भासत नाही. पण प्रोटीन पावडरमुळे शरीराला अधिक प्रोटीन देण्यास मदत करतं. याचा शरीरातील इतर पोषक तत्वांवर परिणाम दिसून येतो.
इन्टेस्टाइनल माइक्रोबायोटा
हे प्रोटीन लॅक्टोफेरिनसारख्या काही तत्वांचा स्त्रोत असतो. यामुळे पोटाच्या समस्या होतात. यामुळे पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि गॅस किंवा अपचनाच्या समस्याही होऊ शकतात.
टॉक्सिक
स्वस्त प्रोटीन पावडरमध्ये शरीराला हानिकारक अशी अनेक तत्व असतात. जी शरीरासाठी हानिकारक असतात. हे डोकेदुखी, थकवा, बद्धकोष्ट आणि स्नायूंमध्ये वेदना होण्याचं कारण बनतात.
इन्सुलिनचा स्तर वाढवा
कधी कधी प्रोटीन पावडर इन्सुलिनवर परिणाम करतं. वर्कआउट केल्यानंतर प्रोटीन पावडरचा उपयोग, इन्सुलिनमध्ये वाढ करतं आणि सतत होणारी ही वाढ शरीरासाठी हानिकारक ठरते.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही.