ऑफिसवर्कमुळे शरीराची चरबी वाढत असेल तर 'या' टिप्स वापरून स्वतःला ठेवा मेंटेन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 11:25 AM2020-02-05T11:25:25+5:302020-02-05T11:26:56+5:30

सध्याच्या काळात वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे वजन वाढण्याची समस्या अधिकाधिक वाढत चालली आहे.

Body fat increases because of office work, keep yourself fit using these tips | ऑफिसवर्कमुळे शरीराची चरबी वाढत असेल तर 'या' टिप्स वापरून स्वतःला ठेवा मेंटेन!

ऑफिसवर्कमुळे शरीराची चरबी वाढत असेल तर 'या' टिप्स वापरून स्वतःला ठेवा मेंटेन!

Next

सध्याच्या काळात वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे वजन वाढण्याची समस्या अधिकाधिक वाढत चालली आहे. तासनतास ऑफिसमध्ये बसल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढत जाते. तसंच आपण चहा आणि कॉफिचं सेवन सुद्धा जास्त करत असतो. त्यामुळे फॅट्स वाढतात. पण तुम्हाला ऑफिसवर्क करताना सुद्धा स्वतःला मेंटेन ठेवायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता.


जास्त चालण्याचा प्रयत्न करा

जेव्हा तुम्ही ऑफिसचं काम संपवून घरी जाता तेव्हा पायी चालत जाण्याचा प्रयत्न करा.  लिफ्टच्या ऐवजी शिड्यांचा वापर करून चढा, काम करत असताना मधल्या वेळेत राऊंड मारा. ऑफिसमध्ये चहा पिणं टाळा. चहाच्या ऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफीचं सेवन करा. 

शरीरातील स्थिती नीट ठेवा

जेव्हा तुम्ही काम करत असता त्यावेळी नेहमी सरळ बसण्याचा प्रयत्न करा.  त्यामुळे तुमची मान, पाठ, खांद्यांमध्ये दुखणं थांबेल.  जर  तुमची खुर्ची आरामदायक नसेल तर कुशन ठेवून बसा.  कारण तुमच्या बसण्याची स्थिती सुद्धा वजम कमी करण्यासाठी महत्वाची असते. 

शरीर हायड्रेट करत रहा

पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या डेस्कवर पाण्याची बॉटल ठेवा आणि   ठराविक वेळानंतर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि सतत लघवी लागल्यानंतर तुम्ही वॉशरूमला जाण्याच्या निमित्ताने जागेवरून उठाल.

चेयर एक्सरसाइज करा

वजन कमी करण्यासाठी आवश्यक असलेला व्यायाम बसल्याजागी करा. ज्यामुळे तुमचे शरीर कंम्फरटेबल राहील. स्ट्रेचिंग, नेक रोटेशन, सीटेड टोरसो टिव्स्ट, क्रॉस्ड लेग टो रीच, शोल्डर रोटेशन  हे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. 

स्नॅक्सची सवय बदला

Image result for junk food

स्नॅक्सच्या वेळेत जंक फूड न खाता हेल्थी फुड खाण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये भुक लागल्यानंतर ड्राय फ्रुटस खाण्याचा प्रयत्न करा. कारण जर मधल्या वेळेत तुम्ही तळलेले पदार्थ खाल्ले तर शरीरातील चरबी जास्त वाढण्याचा धोका असतो. 

ब्रेकफास्ट

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात मह्त्वाचं असतं ते म्हणजे ऑफिसला जाण्याआधी सकाळचा नाष्ता पोटभर करा. सकाळच्या नाष्त्यात दोन ते तीन फळं खा. त्यात केळी, सफरचंद आणि डाळिंबाचा समावेश करा. तुम्ही ज्यूस सुद्धा पिऊ शकता. जितका जास्त हेवी आणि पोटभर नाष्ता तु्म्ही कराल तेवढच जास्त तुम्हाला काम करण्यासाठी उत्साह येईल.  तसचं वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येईल. ( हे पण वाचा-विश्वास बसणार नाही 'असं' आहे भूमी पेडणेकरच्या वेटलॉसचं सिक्रेट)

साखरेचे कमी सेवन

जर तुम्हाला शरीराला नेहमी एक्टिव्ह ठेवायचं असेल तर साखरेचे सेवन करू नका. कारण जर तुम्ही कितीही डाएट केले आणि साखरेचं सेवन कमी केलं नाही तर तुमचं वजन कमी होणार नाही. साखरेमुळे शरीरातील फॅट्सचं प्रमाण वाढतं. त्यामुळे चहा कॉफीचं सेवन करण्यापासून दूर रहा. ( हे पण वाचा-गुलाबाच्या सुगंधाने मिळवा चांगली झोप आणि तल्लख बुद्धी, जाणून घ्या काय सांगतो रिसर्च)

Web Title: Body fat increases because of office work, keep yourself fit using these tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.