आनंदी राहण्यासाठी 'हे' उपाय ट्राय करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 05:21 PM2018-11-06T17:21:51+5:302018-11-06T17:23:39+5:30
आपण जेवढे आनंदी राहतो तेवढं आपल्या शरीरासाठीही चांगलं असतं. यामुळे मूडही फ्रेश राहतो. परंतु सध्याच्या या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये सगळेच जण टेन्शनमध्ये असतात. चेहऱ्यावर आनंद दिसतही नाही.
आपण जेवढे आनंदी राहतो तेवढं आपल्या शरीरासाठीही चांगलं असतं. यामुळे मूडही फ्रेश राहतो. परंतु सध्याच्या या धावपळीच्या दैनंदिन जीवनामध्ये सगळेच जण टेन्शनमध्ये असतात. चेहऱ्यावर आनंद दिसतही नाही. अशावेळी तुम्ही फक्त याच विचारात असतो की समस्यांच निवारण करायचं तरी कसं? काही टिप्स आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही काही वेळातच टेन्शन फ्री होऊ शकता. जाणून घेऊयात काही टिप्स ज्या वापरून तुम्ही आनंदी होऊ शकता.
नेहमी पॉझिटिव्ह विचार करा
तुम्ही फार टेन्शनमध्ये असाल तर तुम्ही स्वतःशीच गप्पा मारू शकता. आनंदी राहण्यासाठी बऱ्याचदा स्वतःशी गप्पा मारू शकता. त्यामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट खाल्याने मूड फार फ्रेश होतो आणि मन आनंदी राहण्यासाठी मदत होते. डार्क चॉकलेट्समध्ये असलेले केमिकल्स शरीरातील आनंदी राहण्यासाठी आवश्यक ते घटक असतात. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर डार्क चॉकलेट्सचं सेवन करा.
आपल्या आवडत्या व्यक्तींचा विचार करा
आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांबाबत विचार करा आणि आपल्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी त्या लोकांबाबत विचार करा ज्यांचं तुमच्या आयु्ष्यात फार महत्त्व आहे. त्यामुळे तुमचा मूड चांगला होण्यास मदत होईल.
तणावापासून दूर रहा
जेव्हा तुम्ही फार दुःखी असता त्यावेळी त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा. नकारात्मक विचारांना आपल्या डोक्यातून काढून टाका आणि थोडासा सकारात्मक गोष्टींचा विचार करा.
लिस्ट तयार करा
प्रत्येक वेळी आनंदी राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीची किंवा वस्तूची गरज लागेलच असं नाही. तुम्ही हाच आनंद स्वतःमध्येही शोधू शकता. नकारात्मक परिस्थितींमध्ये अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.