छातीत दुखण्याच्या खूप आधीच दिसतं Heart Attack चं हे लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 02:36 PM2023-10-26T14:36:40+5:302023-10-26T14:40:43+5:30

Heart Attack : जर चालताना किंवा एक्सरसाइज करताना पायात वेदना होत असेल तर हा हृदयरोगाशी संबंधित इशारा असू शकतो.

Body shows leg pain as first symptom of heart attack before chest pain dont ignore it | छातीत दुखण्याच्या खूप आधीच दिसतं Heart Attack चं हे लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

छातीत दुखण्याच्या खूप आधीच दिसतं Heart Attack चं हे लक्षण, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

Heart Attack : सामान्यपणे छातीत वेदना किंवा टोचल्यासारखं वाटल्यावर हार्ट अटॅकचा विचार लोकांच्या डोक्यात येतो. कारण यालाच जास्तीत जास्त लोक पहिलं लक्षण मानतात. पण हा संकेत हार्ट अटॅक आल्यावर मिळतो. मात्र त्याआधीही अनेक संकेत असे असतात जे हार्ट अटॅकचा इशारा देतात. हृदयरोगाच्या सुरूवातीच्या लक्षणांपैकी एक पायावर दिसतं.

जर चालताना किंवा एक्सरसाइज करताना पायात वेदना होत असेल तर हा हृदयरोगाशी संबंधित इशारा असू शकतो. आर्टरीमध्ये प्लाक जमा झाल्याने एथेरोस्क्लेरोसिस होतो आणि पेरिफेरल आर्टरी डिजीज होऊ शकतो. जेव्हा पायाच्या आर्टरी प्लाकमुळे बंद होतात किंवा लहान होतात तेव्हा यात ब्लड सर्कुलेशन कमी होतं. ज्याला सामान्यपणे क्लॉडिकेशनही म्हटलं जातं.

पाय दुखणं आणि हृदयरोगात एक खोलवर संबंध आहे. कारण एथेरोस्क्लेरोसिसमुळे आर्टरी छोट्या होतात. जर पेरिफेरल आर्टरी डिजीजवर उपचार केला नाही तर हळूहळू हार्ट अटॅक आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो.

पायात कुठे होतात वेदना?

अशाप्रकारच्या वेदना सामान्यपणे शरीरात खालच्या भागात होता. ज्यात मांड्या आणि कंबर मुख्य आहे. वेदना चालताना, पायऱ्या चढताना आणि एक्सरसाइज करताना होते. ही समस्या आराम केल्यावर बरी होते.

या समस्येत पायांमध्ये वेदना आणि जडपणा जाणवतो. काही लोकांचे पाय सुन्न होतात, कमजोरी जाणवतो आणि टोचल्यासारखं वाटतं. या वेदना फार वेगळ्या असतात, ज्या सतत जाणवतात. या वेदनांची खास बाब म्हणजे या आराम केल्यावर किंवा बसल्यावर कमी होतात. 

कुणाला जास्त धोका?

जे लोक धुम्रपान करतात आणि मद्यसेवन करतात त्यांना क्लॉडिकेशनची गंभीर समस्या होते. डायबिटीस, ओबेसिटी, खराब लाइफस्टाईल, हाय कोलेस्ट्रॉल, हाय बीपीच्या रूग्णांचा याचा जास्त धोका असतो.

Web Title: Body shows leg pain as first symptom of heart attack before chest pain dont ignore it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.