कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर शरीर देतं हे ५ संकेत, दुर्लक्ष पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 10:41 AM2018-09-25T10:41:15+5:302018-09-25T10:41:41+5:30

कोलेस्ट्रॉल स्तर वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्ट अटॅक आणि हृदयाचे इतर आजार.

Body signs and symptoms of increased cholesterol | कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर शरीर देतं हे ५ संकेत, दुर्लक्ष पडू शकतं महागात!

कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर शरीर देतं हे ५ संकेत, दुर्लक्ष पडू शकतं महागात!

googlenewsNext

सामान्यपणे २० वयानंतर लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलचा स्तर वाढण्यास सुरुवात होते. कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल वॅक्स किंवा मेणासारखा एक पदार्थ असतो. कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातील पेशी आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी महत्त्वाचं असतं. त्यासोबतच शरीर योग्यप्रकारे काम करण्यासाठी शरीरात कोलेस्ट्रॉलचं योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे.

कोलेस्ट्रॉल स्तर वाढल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. जसे की, आर्टरी ब्लॉकेज, स्टोक्स, हार्ट अटॅक आणि हृदयाचे इतर आजार. जेव्हा आपल्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं की, आपलं शरीर काही संकेत देतं. हे संकेत समजून घेऊन वेळीच ब्लड टेस्ट करावी आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका मिळवावी. 

हाता-पायांना झिणझिण्या किंवा मुंग्या येणे

कोलेस्ट्रॉल शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतं त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढल्यावर नेहमी शरीरातील अंगांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचत नाही. याकारणाने हाता-पायांना मुंग्या येणे, झिणझिण्या येणे अशा समस्या होतात. अनेकदा एकाच जागेवर फार जास्त वेळ बसल्यानेही हाता-पायांना झिणझिण्या येतात. पण केवळ एकाच जागेवर न बसताही तुम्हाला असे होत असेलतर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असं समजा. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वेळीच तपासूण घ्यावे. 

डोकेदुखी

जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल किंवा डोकं हलकं वाटत असेल तर वेळी सावध व्हा. कारण हे वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर डोक्यातील नसांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे ही समस्या होते. याच कारणाने डोकेदुखी आणि चक्कर येणे अशा समस्या होतात. 

श्वास भरून येणे

जर थोडं काम केल्यानंतर किंवा मेहनत केल्यानंतर श्वास भरून येत असेल तर हे कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत असू शकतो. श्वास भरुन येणे किंवा थकवा जाणवण्याची अनेक कारणे असू शकतात. पण असे होत असेल तर तुम्ही कोलेस्ट्रॉल तपासून घेणे गरजेचे आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्या कारणाने जास्त काम न करताही थकवा जाणवतो. खासकरुन जाड लोकांमध्ये ही समस्या अधिक बघायला मिळते. 

जाडेपणा

जर तुम्हाला वाटतं असेल की विनाकारण तुमचं वजन वाढलं आहे, तर हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा संकेत असू शकतो. त्यासोबतच तुम्हाला पोटात जड वाटत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त घाम येत असेल तर आणि गरमी होत असल तर कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावा. 

छातीत दुखणे आणि अस्वस्थता

कोलेस्ट्रॉल वाढल्याने मुख्य रुपाने हृदय रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे जर तुम्हाला छातीत वेदना होते असेल, अस्वस्थ वाटत असेल किंवा हृदयाचे ठोके प्रमाणापेक्षा जास्त होत असतील हा कोलेस्ट्रॉल वाढण्याचा संकेत असू शकतो. याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणं ठरु शकतं. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. 
 

Web Title: Body signs and symptoms of increased cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.