हाडांमधून आवाज येतो? सतत कंबर दुखते? समजून घ्या 'हे' व्हिटॅमिन शरीरात कमी झालंय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 09:59 AM2024-04-10T09:59:15+5:302024-04-10T09:59:45+5:30

Vitamin D deficiency : व्हिटॅमिन डी शरीरात कमी झाल्याने वेगवेगळ्या समस्या होतात. अशात व्हिटॅमिन शरीरात कमी झाल्यावर काय लक्षण दिसतात आणि त्यावर उपाय काय करता येईल हे जाणून घेऊ.

Bone density cause vitamin d deficiency symptoms | हाडांमधून आवाज येतो? सतत कंबर दुखते? समजून घ्या 'हे' व्हिटॅमिन शरीरात कमी झालंय!

हाडांमधून आवाज येतो? सतत कंबर दुखते? समजून घ्या 'हे' व्हिटॅमिन शरीरात कमी झालंय!

Vitamin D deficiency : आजकाल जगभरातील लोक व्हिटॅमिन डी च्या कमतरतेने हैराण झाले आहेत. लोक सूर्य किरणांच्या सानिध्यात जास्त येत नसल्याने ही समस्या जास्त होते. सोबतच चुकीच्या लाइफस्टाईलमुळे सुद्धा ही समस्या होते. व्हिटॅमिन डी शरीरात कमी झाल्याने वेगवेगळ्या समस्या होतात. अशात व्हिटॅमिन शरीरात कमी झाल्यावर काय लक्षण दिसतात आणि त्यावर उपाय काय करता येईल हे जाणून घेऊ.

व्हिटॅमिन डी कमी झाल्याची लक्षण 

1) जर तुम्ही सतत आजारी राहत असाल तर हे व्हिटॅमिन डी कमी झाल्याचं मुख्य कारण असू शकतं. रिसर्चमधून समोर आलं आहे की, व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि श्वसनाचं इन्फेक्शन, जसे की, सर्दी, ब्रोंकायटिस आणि निमोनिया यांच्यात एक संबंध आहे.

2) व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात कॅल्शिअमचं अवशोषणात सुधारणा करून हाडे मजबूत करण्यास मदत करतं. हाडे आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होण्याचं मुख्य कारण व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे.

3) सी फूड खाऊनही तुम्ही शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढू शकता. ट्यूना फिश, साल्मन फिशमध्ये भरपूर व्हिटॅमिन डी असतं. मशरूम खाऊनही तुम्ही व्हिटॅमिन डी मिळवू शकता.

4) संत्री खाऊन किंवा त्यांचा ज्यूस पिऊनही तुम्ही व्हिटॅमिन डी मिळवू शकता. नियमितपणे संत्री खाल्ली तर तुम्हाला भरपूर व्हिटॅमिन डी मिळेल. सोबतच इतरही पिवळी फळं खाऊन तुम्ही ते मिळवू शकता. 

Web Title: Bone density cause vitamin d deficiency symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.