हाडांचा कमकूवतपणा पडू शकतो महागात, आजपासूनच फॉलो करा हाडं मजबूत करण्याच्या 'या' टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 01:22 PM2021-08-01T13:22:37+5:302021-08-01T13:23:21+5:30

हाडांच्या मजबुतीसाठी आहारापासून व्यायामापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हाडे मजबूत होण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतात. आपण नैसर्गिकरित्या हाडे कशी मजबूत करू शकतो ते जाणून घेऊया. 

Bone Weakness can invite more diseases, Follow these tips for strong Bones | हाडांचा कमकूवतपणा पडू शकतो महागात, आजपासूनच फॉलो करा हाडं मजबूत करण्याच्या 'या' टिप्स

हाडांचा कमकूवतपणा पडू शकतो महागात, आजपासूनच फॉलो करा हाडं मजबूत करण्याच्या 'या' टिप्स

googlenewsNext

निरोगी शरीरासाठी हाडांचे आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आह. त्यासाठी आहारात पोषक घटक आवश्यक आहेत. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी आहारापासून व्यायामापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. हाडे मजबूत होण्यासाठी आहार आणि जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतात. आपण नैसर्गिकरित्या हाडे कशी मजबूत करू शकतो ते जाणून घेऊया. 

आपल्या आहारात भाज्यांचा समावेश करा
हाडे निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्वे आणि खनिजे आवश्यक असतात. तुमच्या हाडांना ही जीवनसत्वे आणि खनिजे भाज्यांमधून मिळतात. हाडांची कमी घनता हाडांच्या अनेक समस्यांचे कारण आहे. भाज्या खाल्ल्याने तुमच्या हाडांची घनता वाढते आणि ते मजबूत होतात. भाज्या खाणे हाडांसाठी फायदेशीर आहे. आपली हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी भाज्या खा.

आहारात प्रथिन्याचा समावेश करा
प्रथिनामुळे हाडांमध्ये कॅल्शियम सोशले जाते. जर तुमच्या हाडांमध्ये कमी प्रथिने असतील तर तुमची हाडे कॅल्शियम शोषणे थांबवतात, जे तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. प्रथिने हाडे तयार करण्यास आणि हाडे मोडण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. आपल्या हाडांमध्ये अधिक कॅल्शियमचा प्रवाह वाढवण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार घ्या. जर आपण पुरेसे प्रथिने घेत नसाल तर यामुळे हाडांचे नुकसान होऊ शकते.

व्यायाम करा
व्यायाम हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. वजन उचलण्याचे व्यायाम हाडांची ताकद आणि घनता वाढवण्यास मदत करतात. तुम्ही अशा प्रकारे कसरत व्यायाम करा जे आपल्या हाडांचे आरोग्य राखण्यास मदत करतात.

ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड
ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड देखील आपल्या हाडांसाठी आवश्यक आहे. ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड हाडांचे नुकसान थांबवते. अक्रोड, फ्लेक्ससीड आणि चिया बिया यांसारख्या ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडने समृद्ध असलेले पदार्थ खा. हे हाडांचे विघटन कमी करण्यास आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Web Title: Bone Weakness can invite more diseases, Follow these tips for strong Bones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.