इम्यूनिटी वाढवण्यासाठी 'हे' दोन खास ज्यूस ठरतात रामबाण उपाय, आसपासही भटकणार नाही आजारं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 12:45 PM2020-03-20T12:45:45+5:302020-03-20T12:55:06+5:30

शरीरापासून आजारांना दूर ठेवण्यासाठी नियमित भरपूर पाणीही प्यायला हवं. त्यासोबत काही खासड ड्रिंक्सचं सेवन केल्यानेही इम्यूनिटी वाढते.

To boost your immunity drink these 2 special drinks and a food item api | इम्यूनिटी वाढवण्यासाठी 'हे' दोन खास ज्यूस ठरतात रामबाण उपाय, आसपासही भटकणार नाही आजारं!

इम्यूनिटी वाढवण्यासाठी 'हे' दोन खास ज्यूस ठरतात रामबाण उपाय, आसपासही भटकणार नाही आजारं!

googlenewsNext

सतत आजारी पडण्यामागचं मुख्य कारण असतं आपली इम्युनिटी कमजोर होणं. इम्युनिटी कमजोर झाली की शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता कमी होते. हा काही आजार नाही तर एक समस्या आहे. ज्याने लोक आजारी पडतात. इम्युनिटी वाढवण्यासाठी वेगवेगळे फूड्स आहेत. तसेच शरीरापासून आजारांना दूर ठेवण्यासाठी नियमित भरपूर पाणीही प्यायला हवं. त्यासोबत काही खासड ड्रिंक्सचं सेवन केल्यानेही इम्यूनिटी वाढते. असेच काही खास ड्रिंक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे तुम्ही घरीही तयार करू शकता.

आलं, हळद आणि गाजराचा ज्यूस

हा ज्यूस तयार करण्यासाठी आलं आणि गाजर चांगले धुवून घ्या. ओवा, गाजर, लिंबू, काकडी, आलं आणि हळदीचा ज्यूस तयार करा. यात चिमुटभर काळ्या मिऱ्याची पावडर टाका. हे मिश्रण सेवन करा. हळदीमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. काळ्या मिऱ्यात पेपरिन असतं. आल्याच्या मदतीने कोरडा खोकला दर होतो आणि पचनक्रियाही सुधारते. लिंबात व्हिटॅमिन सी असतं ज्याने इम्युनिटी वाढते. तसेच इतक्या पौष्टिक फळांमुळे वेगवेगळे पोषक तत्वही शरीराला मिळतात.

गाजर आणि बीट

गाजर आणि बीटाची पेस्ट करून त्यात राईचं पावडर, थोडं मिरची पावडर आणि पाणी टाका. हे सगळं एका मोठ्या भांड्यात टाका आणि चांगल्या प्रकारे मिश्रित करून घ्या. या भांड्याला झाकण लावा आणि तीन दिवस तसंच ठेवा. त्यासोबतच तुम्ही हे दिवसभर उन्हातही ठेवू शकता. याची टेस्ट आंबट असते आणि 4 ते 5 दिवस सेवन करू शकता. याचा आतड्यांना फार फायदा होतो. तसेच इम्युनिटीही वाढते.

ताज्या हळदीचं लोणचं

हे तयार करण्यासाठी ओली हळद, आलं, मिठ, लिंबू, राईचं तेल आणि काळे मिरे घ्या. हळद आणि आलं चांगलं धुवून घ्या आणि लांब आकारात कापा. एका भांड्यात राईचं तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर बाजूला काढून ठेवा. आता एका बाउलमध्ये लिंबाचा रस काढा. पॅनमध्ये राईच्या बीया टाका. गरम झाल्यावर काढून ठेवा. राईचं तेल थोडं थंड झाल्यावर त्यात हळद, राईच्या बीया आणि आलं टाका. तसेच त्यात लिंबाचा रस, मिठ आणि काळे मिरेही टाका. हे मिश्रण एका डब्यात बंद करून ठेवा. हळदीमध्ये अ‍ॅंटी-इफ्लेमेटरी गुण असतात. याने वेगेवगळ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.


Web Title: To boost your immunity drink these 2 special drinks and a food item api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.