धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी फेल झाल्याने २८ वर्षीय महिलेला गमवावे लागले दोन्ही ब्रेस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:17 AM2020-01-13T10:17:17+5:302020-01-13T10:21:44+5:30
अलिकडे अनेक महिला आकर्षक दिसण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची सर्जरी करतात. यात अनेक महिला ब्रेस्ट सर्जरी सुद्धा करतात. मात्र, यातील सर्वच सर्जरी यशस्वी होतात असं नाही.
अलिकडे अनेक महिला आकर्षक दिसण्यासाठी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांची सर्जरी करतात. यात अनेक महिला ब्रेस्ट सर्जरी सुद्धा करतात. मात्र, यातील सर्वच सर्जरी यशस्वी होतात असं नाही. असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. या महिलेला ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी करणं इतकं महागात पडलं की, तिला दोन्ही ब्रेस्ट गमवावे लागले.
२८ वर्षीय या महिलेचं नाव जारा रॉड्रिग्ज असून ती तुर्कीची राजधानी इस्तानबुलला पोहोचली होती आणि येथील एका डॉक्टरकडून तिने प्लास्टिक सर्जरी केली. पण, डॉक्टरांच्या चुकीमुळे सर्जरी बरोबर झाली नाही आणि त्याची किंमत या महिलेला चुकवावी लागली.
लाखो रूपये केले होते खर्च
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जारा ही तिच्या शरीराने खूश नव्हती. त्यामुळे ती ब्रेस्ट इम्प्लांट आणि tummy tuck म्हणजेच पोटावरील चरबी कमी करण्याची सर्जरी करण्यासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये इस्तानबुल इथे पोहोचली होती. जाराने येथील एका क्लिनिकला ५ हजार पाउंड म्हणजेच साधारण ४ लाख ६५ हजार रूपये दिले होते. जारावर करण्यात आलेली सर्जरी जवळपास ७ तास चालली होती.
सर्जरी केल्यानंतर जारा साउथ वेस्ट इंग्लंडमधील विल्टशायरमध्ये तिच्या घरी पोहोचली. पण काही दिवसात तिच्या ब्रेस्टच्या लेफ्ट इंम्प्लाटमध्ये इन्फेक्शनमुळे फ्लूइड लीक होऊ लागलं होतं आणि तिचं उजव्या बाजूचं ब्रेस्ट पूर्णपणे सैल होऊन लटकू लागलं होतं.
इंम्प्लाट फेल झाल्यामुळे ब्रेस्ट टीशू नष्ट
जाराने नंतर इन्स्टाग्रामवरून तिच्या सर्जरीबाबतची माहिती दिली. तिने एक फोटो शेअर करून क्लिनिकला जाराने तिचे इंम्प्लांट पुन्हा केल्याबाबत सांगितले. पण पुन्हा ती घरी आल्यावर ब्रेस्टमधून फ्लूइड लीक होत होतं. त्यानंतर तर क्लिनिकमधील लोकांनी तिचे फोन घेणेच बंद केले. नंतर २२ नोव्हेंबरला जाराने इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दोन्ही ब्रेस्टचं इंम्प्लाट काढून टाकलं, त्यामुळे तिचे ब्रेस्ट टीशू पूर्णपणे नष्ट झालेत.