महिला, पुरुष दोन्हीही, जर ९ ते ५ नोकरी करत असाल तर...; हा सिंड्रोम गाठणार हे नक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 08:46 PM2024-09-07T20:46:24+5:302024-09-07T20:46:43+5:30
Dead Butt Syndrome हा देखील याच समस्यांमधील आहे. डेड बट सिंड्रोम (DBS) म्हणून ओळखले जाते.
आजच्या काळात धावपळ कमी आणि एका जागेवर बसून काम जास्त झाले आहे. यामुळे अनेकांना ९ ते ५ ऑफिसमध्ये कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसून रहावे लागते. या कामाचे अनेक तोटे आहेत. यामुळे अनेक प्रकारच्या आजाराच्या समस्या घेरू लागतात. एकाच जागी बसून काम केल्याने शारिरीक आणि मानसिक समस्या होण्यास सुरुवात होते.
Dead Butt Syndrome हा देखील याच समस्यांमधील आहे. डेड बट सिंड्रोम (DBS) म्हणून ओळखले जाते. जेव्हा नितंबाचे स्नायू, विशेषत: ग्लूटस मेडियस आणि मिनिमस, जास्त बसल्यामुळे कमकुवत आणि निष्क्रिय होतात तेव्हा याची लागण होते. या आजारामुळे अस्वस्थता, वेदना आणि दीर्घकाळापर्यंत अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पेल्विसला स्थिर करणे, पोश्चर चांगले ठेवण्यासाठी हालचाली सुलभ करण्यासाठी ग्लूट स्नायू आवश्यक असतात.
लक्षण काय...
नितंबांच्या ग्लूटील स्नायूंमध्ये सुन्नपणा आणि किंचित वेदना होतात. पाठीचा खालचा भाग आणि गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना देखील होतात. जेव्हा तुम्ही बसलेले असता किंवा बसल्यानंतर उभे राहता तेव्हा हे जाणवू लागते. खूप बसणे किंवा झोपणे आणि पुरेशी हालचाल न करणे यामुळे हे होते.
उपाय काय...
तुमची निष्क्रिय जीवनशैली बदलणे हा यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. नियमित व्यायाम करणे, ग्लूट मजबूत करणारे व्यायाम करू शकता. स्टँडिंग डेस्क एक्सरसाइज, स्क्वॅट्स, लंग्ज, स्ट्रेचिंग यांच्या मदतीने तुम्ही यापासून आराम मिळवू शकता.