Bowel Cancer: अत्यंत गंभीर आहे बाऊल कॅन्सर! वेळीच जाणून घ्या लक्षणे अन्यथा ठरु शकतो प्राणघातक आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 01:05 PM2022-03-23T13:05:01+5:302022-03-23T13:13:38+5:30

योग्य वेळी निदान न झाल्यास तो प्राणघातक कर्करोग बनू शकतो. या कर्करोगाची शरीरातील नेमक्या कोणत्या भागातून सुरूवात होते यावर आतड्याच्या कर्करोगाला कोलन कर्करोग (Colon cancer) किंवा गुदाशय कर्करोग (Rectal cancer) देखील म्हटले जाऊ शकते.

bowl cancer symptoms causes and remedies | Bowel Cancer: अत्यंत गंभीर आहे बाऊल कॅन्सर! वेळीच जाणून घ्या लक्षणे अन्यथा ठरु शकतो प्राणघातक आजार

Bowel Cancer: अत्यंत गंभीर आहे बाऊल कॅन्सर! वेळीच जाणून घ्या लक्षणे अन्यथा ठरु शकतो प्राणघातक आजार

googlenewsNext

कॅन्सर हा शब्द ऐकताच लोक घाबरतात, कारण हा आजार इतका जीवघेणा आहे की त्यावर वेळीच उपचार न झाल्यास लोकांना जीव गमवावा लागतो. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी एक म्हणजे आतड्याचा (Bowel Cancer) किंवा बाऊल कॅन्सर. आतड्याचा कर्करोग कोलोरेक्टल कर्करोग (colorectal cancer) म्हणूनही ओळखला जातो. हा कर्करोग आतड्याच्या आतील आवरणातून विकसित होतो आणि सामान्यतः पॉलीप्सची (Polyps) वाढ होते. योग्य वेळी निदान न झाल्यास तो प्राणघातक कर्करोग बनू शकतो. या कर्करोगाची शरीरातील नेमक्या कोणत्या भागातून सुरूवात होते यावर आतड्याच्या कर्करोगाला कोलन कर्करोग (Colon cancer) किंवा गुदाशय कर्करोग (Rectal cancer) देखील म्हटले जाऊ शकते.

Cancer.org मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ऑस्ट्रेलियातील पुरुष आणि स्त्रियांमध्ये आतड्याचा कर्करोग हा तिसरा सर्वात कॉमन कर्करोग आहे आणि 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये हा होणं कॉमन आहे. सुमारे 90 टक्के आतड्याचे कर्करोग हे एडेनोकार्सिनोमास (adenocarcinomas) असतात, जे आतड्याच्या अस्तर असलेल्या ग्रंथींच्या ऊतींमध्ये (Glandular tissues) सुरू होतात. कर्करोगाचे काही इतर कमी सामान्य प्रकार देखील लिम्फोमा आणि न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरसह आतड्यांवर परिणाम करू शकतात. तज्ञांच्या मते, ज्या लोकांना आतड्याचा कर्करोग होतो त्यांना पाच वर्षे जगण्याची ७० टक्के शक्यता असते.

आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे

  • संडासमधून रक्त येतं
  • पोटदुखी, पेटके, गोळा येणे
  • गुद्द्वार किंवा गुदाशय मध्ये वेदना
  • बद्धकोष्ठता, अतिसार यांसारख्या आतड्यांच्या कार्यात बदल
  • वजन कमी होणे
  • विनाकारण थकवा जाणवणं
  • गुद्द्वार किंवा गुदाशयमध्ये गाठ
  • अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे
  • एनीमिया, त्वचा पिवळी पडणे
  • श्वास घेताना त्रास होणं
  • लघवीत रक्त येणं, वारंवार लघवी होणं
  • मूत्रामध्ये रंगात बदल
  • आतड्याच्या कर्करोगाचे कारण
  • अनुवांशिक
  • इंफ्लेमेटरी बाउल डिजीजसारखे क्रोन्स डिजीज
  • लाल मांस आणि प्रक्रिया केलेले मांस जास्त प्रमाणात वापरणे
  • पॉलीप्स
  • जास्त वजन किंवा लठ्ठ असणे
  • जास्त मद्यपान आणि धूम्रपान
  • आतड्याच्या कर्करोगाचे निदान

आतड्याच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या वापरल्या जातात. सुरुवातीला शारीरिक तपासणी करून डॉक्टर रुग्णाच्या पोटात सूज तर नाही ना हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तसेच, डिजिटल रेक्टल तपासणीद्वारे, ते गुदाशय किंवा गुदद्वारातील गाठी किंवा सूज तपासतात. याशिवाय रक्त तपासणी, कोलोनोस्कोपी, एमआरआय, सीटी स्कॅन आदी तपासण्याही केल्या जातात.

उपचार
आतड्याचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळून आल्यास तो शस्त्रक्रियेद्वारे बरा करण्याचा प्रयत्न केला जातो. कोलेक्टोमी ही कोलन कर्करोगासाठी सर्वात सामान्य शस्त्रक्रिया आहे. यासोबत रेडिएशन थेरपी, केमोथेरपी आदींचा समावेश आहे.

आतड्याचा कर्करोग टाळायचा असेल तर धूम्रपान, मद्यपान कमी करावे लागेल. तसेच, निरोगी आहार घ्यावा, ज्यामध्ये भरपूर ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश आहे. लाल मांसाचा वापर मर्यादित असावा. प्रक्रिया केलेले मांस टाळा. निरोगी शरीरासाठी वजन नियंत्रित ठेवा. या उपायांचे पालन केल्यास आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.

Web Title: bowl cancer symptoms causes and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.