कोरोना रुग्णांनी केलेली 'ही' चूक कधीही जीवावर बेतू शकते; जाणून घ्या कोणती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 01:51 PM2020-06-08T13:51:36+5:302020-06-08T13:53:01+5:30
लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना, व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना आणि डायबिटीस, हृदयाचे रोग , ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे.
कोरोना व्हायरसने गेल्या काही महिन्यांपासून जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार जसजसा वाढत आहे तसतसं कोरोना व्हायरसबाबत नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. लठ्ठपणाचे शिकार असलेल्या लोकांना, व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना आणि डायबिटीस, हृदयाचे रोग , ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचा धोका जास्त आहे. याबाबत तुम्हाला तुम्हाला माहीतचं असेल. पण ब्लड प्रेशरची समस्या म्हणजेच हायपरटेंशन असलेल्या रुग्णांना त्यांच्या एका चुकीमुळे जीव गमवावा लागू शकतो.
हायपरटेंशन असलेल्या रुग्णांनी जर त्यांची औषध वेळेवर घेतली नाहीत तर जीव सुद्धा गमावावा लागू शकतो. चीनच्या झिजिंग हॉस्पिटलमधील शास्त्रज्ञांनी हुओ शेन शॅन हॉस्पिटलमधील रुग्णांचा अभ्यास केला. याबाबतचे संशोधन युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ५ फेब्रुवारी ते १५ मार्चदरम्यान २ हजारापेक्षा जास्त रुग्णांवर केलेल्या या अभ्यासात संशोधकांना दिसून आलं की, उच्च रक्तदाब नसलेल्या २०२७ पैकी १.१ टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.
तर उच्च रक्तदाब असलेल्या ८५० रुग्णांपैकी ४ टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजेच कोणताही आजार असलेल्या रुग्णांच्या तुलनेत हायपरटेन्शन असलेल्या लोकांना कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका दुप्पटीने आहे. जे लोक आपली ब्लड प्रेशरची औषध वेळेवर घेत नाहीत त्यांना कधीही मृत्यूचा सामना करावा लागू शकतो. कारण अशा रुग्णांना रक्तदाबाच्या औषधांमुळे संरक्षण मिळत असते.
संशोधनाचे अभ्यास फि ली यांंनी सांगितले की, " हाय ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेली असेल तर स्वत:ची जास्त काळजी घ्यायला हवी. ज्या रुग्णांनी काही कारणांमुळे बीपीची औषधं घेणं थांबवलं त्यांचं मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे, हे आम्हाला दिसून आले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणं किंवा सेवन बंद करणं टाळावे.
युद्ध जिंकणार! कोरोनासोबत जगताना भारतीयांना विषाणूंपासून वाचवणार 'या' ६ गोष्टी
दिलासादायक! कोरोनाच्या उपचारात प्रभावी ठरत आहे 'हे' औषध; ३ दिवसात रुग्ण होऊ शकतात बरे