ब्राह्मी म्हणजे निर्सगाचं वरदान; खुपच फायदेशीर...रोगप्रतिकारकशक्ती वाढवते

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 09:43 PM2021-05-30T21:43:48+5:302021-05-30T22:14:31+5:30

आयुर्वेदिक शास्त्रात अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्यांचे महत्त्व वर्णन केलेले आहे. त्यातीलच एक म्हणजे ब्राह्मी. ब्राह्मीच्या तेलाचा वापर केसांसाठी फायदेशीर आहे.

Brahmi is the gift of nature; Absolutely beneficial ... boosts the immune system | ब्राह्मी म्हणजे निर्सगाचं वरदान; खुपच फायदेशीर...रोगप्रतिकारकशक्ती वाढवते

ब्राह्मी म्हणजे निर्सगाचं वरदान; खुपच फायदेशीर...रोगप्रतिकारकशक्ती वाढवते

googlenewsNext

आयुर्वेदिक शास्त्रात अशा बऱ्याच वनस्पती आहेत ज्यांचे महत्त्व वर्णन केलेले आहे. त्यातीलच एक म्हणजे ब्राह्मी. ब्राह्मीच्या तेलाचा वापर केसांसाठी फायदेशीर आहे.  ब्राह्मी केवळ केसांसाठीच फायदेशीर नाही तर बर्‍याच प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे. ब्राह्मीचे फायदे किती आहेत ते जाणून घेऊयात.

रोग प्रतिकारशक्ती वाढते
ब्राह्मीचं सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आजारी पडण्याचा धोका कमी होतो. यातील अँटी-ऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

मेंदूची ताकद वाढवते
ब्राह्मीच्या सेवनाने मेंदूची ताकद तर वाढतेच पण बुद्धीही तल्लख होते. एकाग्रता वाढवण्यासाठीही ब्राह्मीचा फायदा होतो. ब्राह्मीच्या अर्काचं दररोज सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते.

तणाव मुक्तीसाठी
ब्राह्मीचा सर्वात जास्त फायदा होतो तो तणाव मुक्तीसाठी ब्राह्मीचं सेवन केल्याने मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. ब्राह्मी हार्मोनल बॅलन्स करते आणि तणाव कमी करण्यात मदत करते. यात कॉर्टिसोलची पातळी कमी करण्याची क्षमता आहे जी स्ट्रेस हार्मोन म्हणूनही ओळखली जाते. ब्राह्मीच्या तेलाने मालिश केल्यास डोक शांत होतं.

ब्लड शुगर नियंत्रित राहते
दररोज ब्राह्मीचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते आणि हायपोग्लाइसीमियाची समस्या कमी करण्यात मदत होते.

पचनशक्ती सुधारते
ब्राह्मीच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते. त्यातील फायबर आतड्यांमधून हानिकारक पदार्थ काढून पचनशक्ती मजबूत करते.

Web Title: Brahmi is the gift of nature; Absolutely beneficial ... boosts the immune system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.