कोणत्या प्रकारच्या आवाजाला सर्वात वेगाने प्रतिक्रिया देतो मेंदू?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:51 AM2018-12-11T11:51:36+5:302018-12-11T11:54:08+5:30

कुणाशी बोलण्यासोबतच आजूबाजूच्या आवाजांबाबतही आपला मेंदू सतर्क असतो. याच कारणाने कोणत्याही आवाजात आलेला थोडासा बदलही आपल्याला लगेच जाणवतो.

brain focuses on angry voices very fastly | कोणत्या प्रकारच्या आवाजाला सर्वात वेगाने प्रतिक्रिया देतो मेंदू?

कोणत्या प्रकारच्या आवाजाला सर्वात वेगाने प्रतिक्रिया देतो मेंदू?

Next

(Image Credit : newsroompost.com)

काही लोकांचे कान हे फारच सतर्क असतात हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे काही लोकांना बारीकातला बारीक आवाज ऐकायला येतो किंवा फार दूरचा आवाजही ऐकायला येतो. पण आपला मेंदू किंवा कान कोणत्या आवाजाला सर्वात वेगाने प्रतिक्रिया देतो हे जाणून घेणं अनेकांसाठी उत्सुकतेचं होतं. मात्र आता या गोष्टीचा खुलासा एका अभ्यासातून झाला आहे. 

कुणाशी बोलण्यासोबतच आजूबाजूच्या आवाजांबाबतही आपला मेंदू सतर्क असतो. याच कारणाने कोणत्याही आवाजात आलेला थोडासा बदलही आपल्याला लगेच जाणवतो आणि आपलं लक्ष त्या आवाजाच्या स्त्रोताकडे केंद्रीत होतं. याबाबत नुकताच स्वित्झर्लंडच्या जिनेव्हातील यूनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यात आला. यातून हे समोर आलं की, कोणत्या प्रकारच्या आवाजावर आपला मेंदू सर्वात जास्त वेगाने प्रतिक्रिया देतो. 

सोशल, कॉग्निटीव्ह अॅन्ड इफेक्टीव न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, ज्या आवाजातून राग किंवा धमकी दर्शवली जाते, त्या आवाजाकडे आपला मेंदू फार वेगाने प्रतिक्रिया देतो. जेणेकरुन संभावित धोक्यातून बचाव केला जावा. जिनेव्हा विश्वविद्यालय (यूएनआयजीई) च्या अभ्यासकांनी हे दाखवले की, असा स्थितीत आपला मेंदू कशा आणि किती वेगाने प्रतिक्रिया देतो.

जे डोळ्याने होत नाही ते आवाजाने होतं...

डोळे आणि कान हे दोन्ही इंद्रिय व्यक्तीला संभाव्य धोकादायक परिस्थितींचा अंदाज घेण्यास मदत करतात. कुणासाठीही काहीही बघणं महत्त्वपूर्ण असतं, पण डोळे कानाप्रमाणे आजूबाजूचं ३६० डिग्री कव्हरेज घेऊ शकत नाही. आजूबाजूचं बघण्यासाठी आपल्याला मान हलवावी लागते आणि इकडे-तिकडे बघावं लागतं. त्या तुलनेत आवाज तुम्ही एका ठिकाणाहूनही ऐकू शकता. आणि एकावेळी अनेक आवाज ऐकू शकता. यूएनआयजीईचे अभ्यासक निकोलस बुरा यांनी सांगितले की, 'याच कारणाने आमचं स्वारस्य यात आहे की, आपलं लक्ष आपल्या आजूबाजूच्या आवाजांकडे वेगवेगळ्या प्रकारे किती वेगाने जातं आणि आपला मेंदू संभावित धोकादायक स्थितीत कसा बचाव करतो'. 

कसा केला अभ्यास?

ऐकण्यादरम्यान धोकादायक स्थितीबाबत मेंदूची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी २२ मानवी आवाजांच्या लघु ध्वनी तयार केल्यात. काही आवाज सामान्य, काही राग व्यक्त करणारे आणि काही आनंदी होते. दोन लाऊडस्पीकरांच्या माध्यमातून हे आवाज ३५ सहभागी लोकांना ऐकवण्यात आले. यादरम्यान इलेक्ट्रोइन्सेफलोग्रामच्या माध्यमातून मेंदूतील मिलीसेंकदपर्यंतच्या विद्युत हालचाली मोजल्या गेल्या. खासकरुन अभ्यासकांनी ऑडिटरी अटेंशन प्रोसेसशी संबंधित इलेक्ट्रो फिजिओलॉजिकल मुद्द्यावर लक्ष केंद्रीत केले. 

अभ्यासात काय आढळलं?

यूएनआयजीईमधील अभ्यासक लियोनार्डो सेरावोलो म्हणाले की, 'रागामध्ये संभावित धोक्याचा संकेत असू शकतो, याच कारणाने मेंदू फार जास्त वेळ याप्रकारच्या उत्तेजनेचं विश्लेषण करतो'. अभ्यासकांनी सांगितले की, अभ्यासातून पहिल्यांदाच समोर आले आहे की, काही मिलीसेकंदात आपला मेंदू रागीत आवाजाबाबत संवेदनशील असतो. सेरावोला म्हणाले की, 'कठिण परिस्थितींमध्ये संभावित म्हणजे येणाऱ्या धोक्याच्या आवाजाचा स्त्रोत माहिती करणे गरजेचे आहे. कारण हे धोक्याच्या स्थितीत महत्त्वपूर्ण आहे आणि आपल्या अस्तित्वासाठीही फार फायदेशीर आहे'.
 

Web Title: brain focuses on angry voices very fastly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.