दातांचं आरोग्य बिघडलं तर मेंदुचं बिघडेल, वेळीच व्हा सावध नाही तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 10:23 AM2023-07-11T10:23:13+5:302023-07-11T10:23:52+5:30
Dental health: तोंडाचं आरोग्य बिघडलं तर तुम्हाला हिरड्यांची समस्या, दातांना कीड, डायबिटीस, कॅन्सर आणि हृदयाच्या समस्या होऊ शकतात.
Dental health: तुम्हाला जर वाटत असेल की, दात स्वच्छ न केल्याने केवळ दातांना कीड लागू शकते. तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. ओरल हेल्थ म्हणजे तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्याआधी दहा वेळा विचार करा. तोंडाचं आरोग्य बिघडलं तर तुम्हाला हिरड्यांची समस्या, दातांना कीड, डायबिटीस, कॅन्सर आणि हृदयाच्या समस्या होऊ शकतात.
काही जपानी अभ्यासकांनी नुकत्याच केलेल्या शोधानुसार, दातांचं खराब आरोग्य आणि मेंदुच्या क्रियेत संबंध आढळून आला आहे. ज्यातून हे दिसून येतं की, मेंदुचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवणं महत्वाचं आहे.
जपानच्या तोहोकू यूनिवर्सिटीच्या अभ्यासकांनुसार, हिरड्यांचा आजार आणि दातांचं तुटणं याचा संबंध मेंदू संकुचित होण्याशी जुळला आहे. हे मेमरी लॉस आणि अल्झायमरचं कारण ठरू शकतं. याचा असा अर्थ आहे का की, दात खराब झाल्याने किंवा हिरड्यांच्या समस्येने अल्झायमर रोग होऊ शकतो?
हिरड्यांच्या आजार आणि हातांमधील कीड व इतर समस्या या सगळ्या तोंडाच्या आरोग्यामुळे वाढू शकतात. तोहोकू यूनिवर्सिटीच्या अभ्यासानुसार, हिरड्यांची आजार आणि दातांचं नुकसान हिप्पोकॅम्पस आकुंचन पावण्याशी संबंधित आहे. जो मेमरी आणि अल्झायमर रोगासाठी महत्वाचा आहे. पण यातून हे स्पष्ट होत नाही की, यामुळेच अल्झायमरची समस्या होते. यातून फक्त एक लिंक दिसून येते.
अभ्यासातून काय समोर आलं?
जेव्हा त्यांनी अभ्यासाची सुरूवात केली आणि चार वर्षानंतरच्या निष्कर्षांची तुलना केली तेव्हा त्यांना दिसलं की, दात तुटणे आणि हिरड्यांच्या आजारासोबत मेंदुच्या डाव्या हिप्पोकॅम्पसमध्ये बदल यात एक संबंध आढळला. मेंदुचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तोंडाचं आरोग्यही चांगलं ठेवावं लागेल. हे फार महत्वाचं आहे. जर असं केलं नाही तर मेंदुचं आरोग्य बिघडू शकतं.