ब्रेन ट्यूमरच्या 'या' ७ संकेतांकडे दुर्लक्ष करणं ठरू शकतं जीवघेणं, सुरुवातीलाच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 05:17 PM2024-08-03T17:17:07+5:302024-08-03T17:21:37+5:30

ब्रेन ट्यूमरच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया, ज्याकडे लोक सहसा लक्ष देत नाहीत. परंतु हे संकेत ओळखणं फार महत्त्वाचं आहे जेणेकरुन आपण वेळेत डॉक्टरांशी संपर्क साधू शकतो आणि आपला जीव वाचवू शकतो.

brain tumor 7 early symptoms most people ignore it | ब्रेन ट्यूमरच्या 'या' ७ संकेतांकडे दुर्लक्ष करणं ठरू शकतं जीवघेणं, सुरुवातीलाच व्हा सावध

ब्रेन ट्यूमरच्या 'या' ७ संकेतांकडे दुर्लक्ष करणं ठरू शकतं जीवघेणं, सुरुवातीलाच व्हा सावध

आपल्या मेंदूचे आरोग्य आपल्या संपूर्ण शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. ब्रेन ट्यूमर हा एक आजार आहे जो आपल्या मेंदूच्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. यावर वेळीच उपचार न केल्यास तो प्राणघातकही ठरू शकतो. ब्रेन ट्यूमरच्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया, ज्याकडे लोक सहसा लक्ष देत नाहीत. परंतु हे संकेत ओळखणं फार महत्त्वाचं आहे जेणेकरुन आपण वेळेत डॉक्टरांशी संपर्क साधू शकतो आणि आपला जीव वाचवू शकतो.

ब्रेन ट्यूमरचे सुरुवातीचे संकेत

डोकेदुखी -  वारंवार खूप डोकं दुखणं हे ब्रेन ट्यूमरचं प्रमुख लक्षण आहे. ही डोकेदुखी सहसा सकाळी जास्त होते आणि उठल्यावर वाढते.

मळमळ आणि उलट्या - ब्रेन ट्यूमरमुळे मळमळ आणि उलट्या देखील होऊ शकतात, 

चक्कर येणं - अचानक चक्कर येणं हे देखील ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं.

दृष्टीमध्ये बदल - अंधुक दिसणं किंवा नजर कमकुवत होणं ही देखील ब्रेन ट्यूमरची लक्षणं असू शकतात.

अशक्तपणा - शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा जाणवणे, हात किंवा पायाला मुंग्या येणं ही देखील ब्रेन ट्यूमरची लक्षणं असू शकतात.

वागण्यात बदल - चिडचिड, मूड बदलणं, स्मरणशक्ती कमी होणं किंवा व्यक्तिमत्त्वात बदल होणं हे देखील ब्रेन ट्यूमरमुळे होऊ शकतं.

बोलण्यात अडचण - बोलण्यात अडचण येणं हे देखील ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं.

लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात 

ही लक्षणे इतर रोगांमुळे देखील होऊ शकतात, परंतु ही लक्षणं कायम राहिल्यास आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. ब्रेन ट्यूमर जितक्या लवकर ओळखला जाईल तितक्या उपचार करणं सोपं होईल.
 

Web Title: brain tumor 7 early symptoms most people ignore it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.