Brain tumour symptoms: ब्रेन ट्यूमरचे संकेत आहेत ही दोन लक्षणं, फक्त डोकेदुखी म्हणून करू नका दुर्लक्ष...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 11:51 AM2022-07-11T11:51:02+5:302022-07-11T12:04:11+5:30

Brain tumour cancer early symptoms : ब्रेन ट्यूमरची लक्षणेही फार वेगळी असतात. ज्यांकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. पण असं करणं चुकीचं ठरू शकतं. चला जाणून घेऊ ब्रेन ट्यूमरची काय लक्षणं असतात.

Brain tumour cancer early symptoms in adults children headaches and coordination problems | Brain tumour symptoms: ब्रेन ट्यूमरचे संकेत आहेत ही दोन लक्षणं, फक्त डोकेदुखी म्हणून करू नका दुर्लक्ष...

Brain tumour symptoms: ब्रेन ट्यूमरचे संकेत आहेत ही दोन लक्षणं, फक्त डोकेदुखी म्हणून करू नका दुर्लक्ष...

googlenewsNext

Brain tumour cancer early symptoms : आपलं शरीर शंभर मिलियनपेक्षाही जास्त कोशिकांपासून बनलेलं असतं. प्रत्येक प्रकारचा कॅन्सर कोशिका सेल्सला प्रभावित करतो आणि कोणताही कॅन्सर एक कोशिका किंवा कोशिकांच्या छोट्या समूहातून सुरू होतो. सर्व ब्रेन कॅन्सर, ट्यूमर असतात पण सगळे ट्यूमर कॅन्सर नसतात. विना कॅन्सर असलेल्या ब्रेन ट्यूमरला हलका ब्रेन कॅन्सर ट्यूमर म्हटलं जातं. आजकाल बऱ्याच लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरची समस्या बघायला मिळते. ब्रेन ट्यूमर मेंदूतील कोशिका असामान्य रूपाने विकसीत होण्याला म्हणतात. ब्रेन ट्यूमर 130 पेक्षा जास्त प्रकारचे असतात. ट्यूमर मेंदू किंवा पाठीच्या कण्याच्या कोणत्याही भागात तयार होऊ शकतो. ट्यूमर पुढे जाऊन कॅन्सरचं रूप घेतात. ब्रेन ट्यूमरची लक्षणेही फार वेगळी असतात. ज्यांकडे लोक अनेकदा दुर्लक्ष करतात. पण असं करणं चुकीचं ठरू शकतं. चला जाणून घेऊ ब्रेन ट्यूमरची काय लक्षणं असतात.

ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सर

हलका ब्रेन ट्यूमर सामान्यपणे  हळूहळू वाढतो आणि हा मेंदूच्या काही भागांना नुकसान पोहोचवतो. हा मेंदूला लहानही करू शकतो ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. मेनिंगियोमा, वेस्टिबुलर श्वामोना आणि पिट्यूटरी एडेनोमा हलके ट्यूमर असतात.

यांमध्ये मेनिंगोयोमा ब्रेन ट्यूमर कॅन्सरचा प्रकार असतो. हा सामान्यपणे वेगाने वाढतो आणि मेंदूवर हल्ला करतो. हा ब्रेन कॅन्सर जीवघेणा ठरू शकतो. मेंदूमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूला होणारे ब्रेन ट्यूमर न्यूरोब्लास्टोमा, चोंड्रोसारकोमा आणि मेडुलोब्लास्टोमा आहेत.

ब्रेन कॅन्सरची मुख्य लक्षणे

तज्ज्ञांनुसार, ब्रेन ट्यूमर कळून येणं फार अवघड आहे. अनेक केसेसमध्ये ब्रेन ट्यूमर जीवघेणा ठरू शकतो आणि याच्या लक्षणांवर कन्फ्यूजनही होऊ शकतं. उदाहरणार्थ सतत डोकेदुखी आणि कॉडिनेशन संबंधित समस्या ब्रेन ट्यूमरची दोन सामान्य लक्षणं असू शकतात. ब्रेन ट्यूमरची लक्षणं वयस्क आणि लहान मुलांमध्ये वेगवेगळी असू शकतात.

ब्रेन ट्यूमरची मुख्य लक्षणं

सतत डोकेदुखी

धुसर दिसणं

झटके येणं

चक्कर येणं

मळमळ किंवा सतत उलट्या येणं

बोलण्यात समस्या

हात-पायात झिणझिण्या

टेस्ट आणि गंधाची कमतरता

लहान मुलांमध्ये ब्रेन कॅन्सरची लक्षणं

कॉडिनेशनमध्ये कमतरता

डोक्याची असामान्य स्थिती

जास्त लहान लागणे

पुन्हा-पुन्हा लघवी लागणे

सतत किंवा गंभीर डोकेदुखी

धुसर दिसणे

झ़टके येणं

मळमळ होणं
थकवा जाणवणं

Web Title: Brain tumour cancer early symptoms in adults children headaches and coordination problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.