निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2016 02:36 PM2016-09-27T14:36:52+5:302016-09-27T20:08:30+5:30

शरीर निरोगी ठेवायचे असेल तर सकाळी ब्रेकफास्ट करणे आवश्यक आहे.

Brake fast is important for healthy living | निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा

निरोगी जीवनासाठी ब्रेक फास्ट महत्त्वाचा

googlenewsNext

/>
निरोगी राहण्यासाठी सकाळचा ब्रेकफास्ट हा फार महत्त्वाचा आहे. मात्र, या स्पर्धेच्या युगात अनेकांच्या जीवनशैलीचे वेळापत्रक पार बदलून गेले आहे. यामुळे ब्रेकफास्टही काहींना वेळेवर घेता येत नाही. त्याचे विविध प्रकारचे दुष्परिणामही आहेत. त्याकरिता शरीर निरोगी ठेवायचे असेल तर  सकाळी ब्रेकफास्ट करणे आवश्यक आहे. त्याकडे दुर्लक्ष केले तर त्याचे आरोग्यावर दुरगामी परिणामी होतात.  त्याचीच माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.  

ब्रेकफास्ट का आहे आवश्यक :
दररोज सकाळी  ब्रेकफास्ट करणे हे शरीरासाठी उत्तम आहे.  रात्रीच्या झोपेनंतर  पचनशक्तीला ताजेतवाने ठेवण्यासाठी पौष्टिक पदार्थांचा त्यामध्ये समावेश करावा. त्यामुळे कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊन, दिवसभर काम करण्यासाठी ऊजार्ही मिळते. तसेच दुपारी जादा भूक लागत नाही व त्यामुळे पचनक्रियाही चांगली राहते. मनाची एकाग्रता ठेवण्यासाठीही सकाळचा ब्रेकफास्ट आवश्यक आहे.

काय असावे ब्रेकफास्टमध्ये  : दडपे पोहे, दही पोहे, दूध पोहे, मक्याचे पोहे, हिरव्या पालेभाज्यांचे पराठे  खीर, खारीक, बदाम पूड, उकडलेले अंडी, सुकामेवा, शेंगणदाणा, राजगिरा, कणीक, मूग, नाचणी पिठाचा लाडू, थालीपीठ व पुºया, कॉर्नफ्लेक्स, आॅम्लेट पोळी , धिरडे,  फळे, सुकामेवा व मोड आलेली धान्य याचा ब्रेकफास्टमध्ये समावेश असावा.

ब्रेकफास्टचे फायदे : सकाळी ब्रेकफास्ट केल्याने तब्येत उत्तम राहते. चिडचिडपणा होत नसून उलट एकाग्रता चांगली राहते. हृदयाचा आजार किंवा मधुमेह असणाºया रुग्णांसाठी तर  ब्रेकफास्ट हा खूप गरजेचा आहे.  शरीराला दिवसभर गतीशील ठेवण्यासाठी व  आळस दूर ठेवण्यासाठी आवश्यक आहे. सकाळी जर ब्रेकफास्ट केला नाहीतर वेळोवेळी खाण्याची इच्छा निर्माण होते. असे वेळोवेळी खाणे हे आरोग्यासाठी चांगले नसून, त्यामुळे विविध समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच त्यांचे वजनही वाढू शकते. ताज्या व पौष्टिक ब्रेकफास्टामुळे दिवसभर उत्साह राहतो. सकाळी घरातून बाहेर पडताना ब्रेकफास्ट करणे हे आवश्यक आहे.  तसेच लहान मुलांचे  अभ्यासात मन चांगले रमते. तसेच ते अधिक तळमळीने दिलेले काम पूर्ण करतात. जी मुले ब्रेकफास्ट करीत नाहीत. ती थकलेली वाटतात व चिडचिड्या स्वभावाची होतात.

ब्रेकफास्ट ही एक फॅशन : ब्रेकफास्ट करणे हे आरोग्यासाठी उत्तम आहे. परंतू, अलीकडे फॅशन म्हणून ब्रेकफास्टकडे बघीतले जात आहे. घरी बे्रकफास्ट न करता बाहेर हॉटेलमध्ये जाऊन, ब्रेकफास्ट करणे ही आपल्याकडे फॅशन रुजत चालली आहे. त्यामुळे वीकेंडला तर हॉटेल फुल्ल होतात.
 
cnxoldfiles/strong> : आपल्याकडील स्टार मंडळी ही  कामात कितीही बिझी असली. तरीही सकाळचा ब्रेकफास्ट वेळेवर घेतात. तसेच दररोज त्यामध्ये वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी त्यांच्या फेमस हॉटेल्स या ठरलेल्या आहेत. यावरुनच ब्रेकफास्ट दररोजच्या आहारात किती महत्वाचा आहे, हे लक्षात येते.

Web Title: Brake fast is important for healthy living

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.