चिंताजनक! समोर आलं कोरोनाचं नवं रूप; जीवघेणा ठरणार कोरोनाचा P1 स्ट्रेन? वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 07:35 PM2021-03-02T19:35:26+5:302021-03-02T19:45:42+5:30
CoronaVirus News & Latest Updates :आता ब्रिटन सरकार आणि प्रशासनाकडून अशा लोकांचा शोध घेतला जात आहे जे या संक्रमित सहा लोकांच्या संपर्कात आले होते.
कोरोना व्हायरस सहजासहजी जगाची पाठ सोडणार नाही असं दिसून येत आहे. आता ब्राझिलमध्ये कोरोना व्हायरसचे दोन नवीन स्ट्रेन समोर आले आहेत. या दोन स्ट्रेनशी संबंधित प्रकरणं ब्रिटनमध्येसुद्धा आढळून आली आहेत. ब्राझिलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनच्या २ वेरिएंटनं ब्रिटनमध्ये ६ लोक आजारी पडले आहेत. तीन इंग्लँड आणि तीन स्कॉटलँडमध्ये सापडले आहेत. त्यामुळे आता ब्रिटन सरकार आणि प्रशासनाकडून अशा लोकांचा शोध घेतला जात आहे जे या सहा लोकांच्या संपर्कात आले होते.
ब्राझिलमधील कोरोना व्हायरस ब्रिटनमध्ये पोहोचल्याचे दिसून आले आहे. या वेरिएंटचे नाव P1 आणि P2 असून कोरोना व्हायरसचा सगळ्यात पहिला स्ट्रेन जपानमध्ये दिसून आला होता. मागच्यावर्षी एप्रिलमध्ये कोरोनाची मोठी लहर पाहायला मिळाली होती. या परिसरात ऑक्टोबरमध्ये ७६ टक्के लोकांमध्ये एंटीबॉडी दिसून आल्या.
चकीत करणारी गोष्ट अशी की, यावर्षी कोरोनाच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. बरे झालेले लोक पुन्हा एकदा संक्रमित होऊ लागले आहेत. तपासणीदरम्यान दिसून आलं की, जपानमधून आलेला p1 कोरोनाचा स्ट्रेन ब्राझिलमध्ये जाऊन p2 झाला आहे. यामुळे व्हायरसचा प्रसार वेगानं होत आहे.
यूके न्यू एंण्ड इमर्जिंग रेस्पिरेटरी वायरस थ्रेट्स एडवाइजरी ग्रुप (Nervtag) ने P1 ला कोरोनाचा चिंताजनक आणि धोकादायक स्ट्रेन असल्याचे म्हटले आहे. हा व्हायरस ब्रिटनच्या केंट आणि B-118 प्रमाणेच संक्रामक आहे. त्यांच्यामते P1 स्ट्रेनमध्ये १७ प्रकारचे ३ जेनेटिक मटेरिअल नष्ट झाले असून ४ म्यूटेशन्स झाले आहेत. P1 स्ट्रेन K417T, E484K आणि N501Y हे ३ वेरिएंट लोकांना संक्रमित करत आहेत. युरोपात P1 माहामारीचं रूप घेऊ शकतो अशी भीती लोकांना आहे.अरे व्वा! भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केली खास टेक्नोलॉजी; हवेतच कोरोना व्हायरस मारला जाणार
आतापर्यंत P1 स्ट्रेनची कमी प्रकरणं दिसून आली असून ३ इंग्लंडमध्ये आणि ३ स्कॉटलँडमध्ये दिसून आले आहेत. जुन्या कोरोना व्हायरसच्या तुलनेत या कोरोना व्हायरसचं संक्रमण वेगानं पसरत असल्याचे दिसून येत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनसार P1स्ट्रेनच्या संक्रमणाबाबत अधिक माहिती मिळणं कठीण आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत किती लोक संक्रमित होतील हे सांगू शकणंही सध्याच्या स्थितीत शक्य नाही. काळजी वाढली! महाराष्ट्रातील 'हा' भाग बनतोय कोरोनाचं केंद्र; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा