वर्कआउट करण्याआधी की नंतर, केव्हा नाश्ता करणं ठरतं शरीरासाठी फायदेशीर?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 12:54 PM2019-09-09T12:54:00+5:302019-09-09T12:54:23+5:30

वजन कमी करत असणाऱ्या लोकांपुढे एक प्रश्न नेहमीच असतो तो म्हणजे, आपम जी एक्सरसाइज करतोय ती खरचं आपल्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतेय का?

Breakfast should be done before or after workout know exact timings | वर्कआउट करण्याआधी की नंतर, केव्हा नाश्ता करणं ठरतं शरीरासाठी फायदेशीर?

वर्कआउट करण्याआधी की नंतर, केव्हा नाश्ता करणं ठरतं शरीरासाठी फायदेशीर?

Next

वजन कमी करत असणाऱ्या लोकांपुढे एक प्रश्न नेहमीच असतो तो म्हणजे, आपम जी एक्सरसाइज करतोय ती खरचं आपल्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतेय का? याशिवाय जी एक्सरसाइज करण्यासाठी जिममध्ये ते तासन्तास घाम गाळत आहेत, ती एक्सरसाइज अनोशापोटी करावी की, नाश्त्यानंतर करावी? 

अनेकदा तज्ज्ञांकडून काही व्यायामाचे प्रकार अनोशापोटी करण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच काही एक्सरसाइज नाश्ता करून त्यानंतरच खाण्याचा सल्ला दिला जातो. असातच कोणीही कन्फूज होणं सहाजिकच आहे. कोणीही वर्कआउट करण्याआधी त्याबाबत संपूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे सर्वात आधी स्वतःचं कंफ्युजन दूर करा. 

सर्वात आधी जाणून घ्या की, रिकाम्या पोटी एक्सरसाइज करणं आणि ब्रेकफास्ट केल्यानंतर एक्सरसाइज करण्याचे काय फायदे आहेत आणि नुकसान आहेत? तसेच हेदेखील जाणून घ्या की, कोणत्या एक्सरसाइज नेहमी अनोशापोटी करणं आवश्यक आहेत. तसेच कोणत्या एक्सरसाइज नाश्त्यानंतर करणं फायदेशीर ठरतं. 

अनोशापोटी एक्सरसाइज करण्याचे फायदे : 

तज्ज्ञांच्या सलल्यानुसार, जर काही खाऊन एक्सरसाइज केली तर त्यामुळे फारसा फरक पडत नाही. पम तेच जर एक्सरसाइज अनोशापोटी करण्यात आली तर मात्र फरक जाणवतो. कारण अनोशापोटी शरीराती फॅट्स आणि कॅलरी बर्न होण्यास मदत होते. 

तुम्ही हार्ड कोर एक्सरसाइज करत असाल तर अनोशापोटी एक्सरसाइज करणं शक्यतो टाळाच. एक्सरसाइज करताना एनर्जी खर्च करणं आवश्यक असतं आणि तुम्ही अनोशापोटी तुमच्या शरीरामध्ये अजिबात ऊर्जा नसते. त्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हलका फुलका नाश्ता करणं आवश्यक आहे. 

कोणत्या एक्सरसाइज अनोशापोटी कराव्यात? 

जर तुम्ही ब्रिस्क वॉकिंग किंवा जॉगिंगसाठी जात असाल तर नोशापोटी जाणं फायदेशीर ठरतं. योगा, प्राणायामसाठी नेहमी अनोशापोटी असणं आवश्यक आहे. तसेच पाणी प्यायचं असेल तर तेही कमीच प्या आणि अर्धा तास अगोदर प्या. तसेच एक्सरसाइज केल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळा. 

द टाइम्स नाऊ ने दिलेल्या वृत्तानुसार, जर तुम्ही हार्डकोअर एक्सरसाइज करत असाल तर पुशअप, ट्रेडमिल रनिंग, स्किपिंग, फास्ट जुम्बा इत्यादी एक्सरसाइज अनोशापोटी करणं टाळावं. वर्कआउट करण्यापूर्वी एक तास अगोदर हलका ब्रेकफास्ट करा. त्यामुळे वर्कआउट स्टॅमिना वाढण्यास मदत होते. 

वर्कआउट करण्याआधी तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेड युक्त आहात घेऊ शकता. जसं ओट्स-मुसळी किंवा दूध, ब्रेडसोबत ऑमलेट, अंडी, दही, ड्रायफ्रुट्स किंवा पनीर भुर्जीसोबत चपाती इत्यादी. नेहमी एक्सरसाइज आणि ब्रेकफास्टमध्ये कमीत कमी एक तासाचं अंतर ठेवा. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दाव करत नाही. एक्सरसाइज आणि ब्रेकफास्ट यांचा थेट शरीरावर परिणाम होत असतो. तसेच प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.)

Web Title: Breakfast should be done before or after workout know exact timings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.