सकाळी नाश्त्यात ब्रेड-जॅमसह हे 4 पदार्थ खाणं टाळा, पडू शकतात महागात!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 04:05 PM2023-11-17T16:05:28+5:302023-11-17T16:05:54+5:30

Health Tips : सकाळच्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. पण नाश्ता कशाचा करायचा आणि कशाचा नाही याची काळजी घ्यावी लागते.

Breakfast Tips : Do not eat these thing morning breakfast | सकाळी नाश्त्यात ब्रेड-जॅमसह हे 4 पदार्थ खाणं टाळा, पडू शकतात महागात!

सकाळी नाश्त्यात ब्रेड-जॅमसह हे 4 पदार्थ खाणं टाळा, पडू शकतात महागात!

Health Tips : दिवसाची चांगली सुरूवात करण्यासाठी आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी  जास्तीत जास्त लोक सकाळी गरमागरम नाश्ता करतात. नाश्त्यामध्ये लोक वेगवेगळे पदार्थ खातात. पण कोणत्याही पदार्थांचं सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं असतं. खासकरुन सकाळचा नाश्ता. सकाळच्या नाश्त्याला एक वेगळंच महत्व आहे. सकाळच्या नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभरासाठी ऊर्जा मिळते. पण नाश्ता कशाचा करायचा आणि कशाचा नाही याची काळजी घ्यावी लागते. त्या खालीलप्रमाणे सांगता येतील.

1) ज्यूस किंवा शेक

फ्रूट ज्यूस तसं तर आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पण सकाळी ज्यूस पिणे चांगलं नसल्याचं सांगितलं जातं. ज्यूसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅसिड असतात, जे शरीराला नुकसान पोहोचवतात. 

2) ब्रेड जॅम

ब्रेड आणि जॅम दोन्हीमध्ये फॅट आणि शुगरचं प्रमाण अधिक असतं. या दोन्ही पदार्थांचा रक्तावर प्रभाव होतो. ब्रेडसोबत अंडं खाणं चांगलं राहिल. पण सकाळी ब्रेड आणि जॅम खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

3) मांस

जेव्हा कधीही मांस अधिक प्रमाणात खाल्ल जातं तेव्हा काहीना काही नुकसान होतं. पण सकाळी मांस खाणं अजिबात चांगलं नाही. मांसामध्ये नायट्रेट असतं ते अधिक प्रमाणात खाल्याने त्वचेसंबंधी समस्या होतात. 

4) गोड पदार्थ किंवा चॉकलेट

सकाळी कोणताही गोड पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. सकाळच्या वेळी जास्त गोड पदार्थ खाल्यास शुगर लेव्हलवर प्रभाव पडतो. दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणावेळी गोड खाणे फायद्याचे असते. पण सकाळी गोड खाऊ नये.  

Web Title: Breakfast Tips : Do not eat these thing morning breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.