ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं सांगणारी ‘स्मार्ट ब्रा!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 04:53 PM2017-05-11T16:53:42+5:302017-05-11T16:53:42+5:30

ब्रेस्ट कॅन्सरचं प्राथमिक लक्षणं सांगू शकणारी ब्रा बनवल्याचा १८ वर्षाच्या मुलाचा दावा

Breast Cancer Symptoms 'Smart Bra!' | ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं सांगणारी ‘स्मार्ट ब्रा!’

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं सांगणारी ‘स्मार्ट ब्रा!’

Next

- निशा चढ्ढा

मेक्सिकोत राहणाऱ्या १८ वर्षाच्या मुलानं सेन्सर्स असलेली एक स्मार्ट ब्रा बनवल्याचा दावा केला आहे. ही ब्रा अंगात घातली तर स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचं निदान लवकर होवू शकेल आणि अनेक जीव वाचतील असा दावा या मुलानं केला आहे. ज्युलिअन रिओ चाण्टू असं या मुलाचं नाव आहे. त्याची आई स्तनाच्या कर्करोगाला बळी पडली, स्तनातील गाठ, स्तन काढून टाकल्यावरही कॅन्सरशी तिचा लढा चालूच राहिला. या कॅन्सरचं निदान वेळीच झालं असतं तर आपली आई वाचली असती असं त्याला वाटू लागलं. त्यावर त्यानं संशोधन सुरु केलं आणि ही विशेष ब्रा तयार केली.
आजच्या घडीला तरी स्तनाच्या कॅन्सरचं लवकर निदान किवा तो आपल्याला होवू शकतो का हे तपासण्याची फारशी यंत्रणा नाही. हातानं स्वत:च स्वत:ला तपासून ही शक्यता नाही हे बघावं लागतं. मात्र अनेकदा स्तनातला कॅन्सर आहे हे लक्षात येत नाही. त्यावर इलाज म्हणून या मुलानं ही ब्रा तयार केली. ज्यात २०० सेन्सर्स आहेत. ही ब्रा साधारण १ तास ते एक आठवडा परीधान केली असता हे सेन्सर्स स्तनाचा आकार, रंग, तापमान यासाऱ्याची माहिती जमा करतील. ती माहिती स्मार्ट फोन किंवा कम्प्युटरला जोडलेली असेल. त्यातले हीट सेन्सर्स रक्तपुरवठ्याचा, त्यातल्या पेशींचा, पेशींच्या वाढीचाही कल पाहतील, त्याचा डाटा तयार होईल. त्यानंतर आर्टिफिशियल इंटिलिजन्सद्वारे ही माहिती प्रोसेस होवून कॅन्सरची शक्यता आहे की नाही हे सांगितलं जावू शकतं.
अर्थात हे संशोधन अजूनही प्राथमिक स्वरुपात असून त्यावर काम सुरु आहे.

Web Title: Breast Cancer Symptoms 'Smart Bra!'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.