फक्त करा 'हे' ब्रीदींग एक्सरसाईज आणि पोटाच्या चरबीपासून मुक्तता मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:14 PM2021-05-11T20:14:54+5:302021-05-11T20:16:10+5:30
वजन घटतंय पण पोटाची चरबी काही घटेना, मग करा ही आसनं आणि पोटाच्या चरबीपासून मुक्त व्हा...
व्यवस्थित आहार घेतला. रोज व्यायाम केला तर वजन घटतेच घटते. पण पोटाच्या चरबीचं (Belly fat) काय? ती कमी करणं कठिणच. यासाठी तुम्ही योगासनांची (Yoga) मदत घेऊ शकता. ही योगासने म्हणजे श्वासोच्छवासाचे साधे सोपे व्यायामप्रकार . कोणते ते वाचा खाली...
माऊथ ब्रिदींग
तोंडाने श्वासोच्छवास करणे हा पोटावरील चरबी कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. सर्वप्रथम मनातल्यामनात १० मोजत नाकाने श्वास घ्या. त्यानंतर २० मोजता मोजता श्वास तोंडाने सोडा. हे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. एका वेळेला ५ ते १० वेळाच तुम्ही करू शकता. या व्यायामात जेव्हा तोंडाने श्वास सोडला जातो तेव्हा पोटातील मांसपेशींवर दबाव येतो. त्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
बेली ब्रिदींग
सर्वप्रथम सरळ उभे रहा किंवा खुर्चीवर सरळ बसा. आपल्या पोटावर हात ठेवा. आपला अंगठा नाभीजवळ येऊ द्या. आता दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. लक्षात ठेवा या आसनात तुमची छाती न फुलता पोट मागे पुढे झालं पाहिजे.
डायफ्राम ब्रिदींग
सर्वप्रथम पालथे झोपा. आता दीर्घ श्वास आणि सोडा. तुमचे पोट आत बाहेर झाले पाहिजे. यामुळे तुमच्या पोटातील चरबी कमी होईलच पण पचनक्रियाही सुधारेल. हे योगासन तुम्ही कधीही करू शकता मात्र, जेवणानंतर करू नका.
डीप ब्रिदींग
पालथे झोपा. आपले दोन्ही हात एकावर एक असे पोटाजवळ आणा. डोळे बंद करा. दिर्घ श्वास घ्या आणि सोडा असे जवळजवळ १० मिनिटं करा.