पायऱ्या चढताना धाप लागत असेल तर असू शकतो या गंभीर आजारांचा धोका, लगेच डॉक्टरांना भेटा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 01:05 PM2023-08-07T13:05:58+5:302023-08-07T13:18:08+5:30
Breathlessness: हेल्थ डायरेक्टनुसार, फुप्फुसांचा आजार, इन्फेक्शन, पॅनिक अटॅक आणि फुप्फुसांच्या नसामध्ये ब्लॉकेज असल्याने व्यवस्थित श्वास घेता येत नाही.
Breathlessness: हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, आपला श्वास थांबला तर आपलं जीवन संपतं. अनेक घातक आजारांमुळे आपल्याला श्वास घेण्यास समस्या होते. बऱ्याच लोकांना पायऱ्या चढणे, पायी चालणे किंवा छोटं-मोठं काम करते वेळीही धाप लागते. हे एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.
हेल्थ डायरेक्टनुसार, फुप्फुसांचा आजार, इन्फेक्शन, पॅनिक अटॅक आणि फुप्फुसांच्या नसामध्ये ब्लॉकेज असल्याने व्यवस्थित श्वास घेता येत नाही.
खोकला, घाबरलेपणा, छातीत दाटणे, छातीत वेदना होणे, शिंका येणे, नाक बंद होणे, घशात वेदना होऊ शकतात. या लक्षणांना हलक्यात घेऊ नका. ही लक्षणं दिसली की, लगेच डॉक्टरांना संपर्क करा.
वातावरण बदलात सावध रहा
वातावरण बदललं की, श्वासाची समस्या आणखी गंभीर होत जाते. या काळात व्हायरस आणि बॅक्टेरियाचा धोका अधिक असतो. जे तुमच्या श्वासनलिकेत सूज आणू शकतात.
ही कामं सोडा
जर तुम्हाला पायऱ्या चढताना किंवा कोणतंही काम करताना धाप लागत असेल तर स्मोकिंग, लठ्ठ करणारे पदार्थ, सुस्त जीवनशैली, फॅट असलेले पदार्थ सोडले पाहिजे. याने गंभीर आजार होऊ शकतो.
काय खावे?
फुप्फुसांना मजबूत करण्यासाठी अॅंटी-ऑक्सिडेंट आणि अॅंटी-इन्फ्लामेटरी पदार्थ खाणं गरजेचं असतं. त्यामुळे हळद, टोमॅटो, आंबट फळं, भोपळा, सफरचंद, बीट नक्की खावेत.
रोज प्या आल्याचा चहा
मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी फुप्फुसांची सफाई गरजेची असते. जर तुम्ही रोज आले, लिंबू आणि मध यापासून चहा प्याल तर फायदा होईल. याने फुप्फुसांच्या नसा रिलॅक्स होतात आणि कफही बाहेर निघतो.