चालता-फिरता, डान्स करताना येतोय लोकांना हार्ट अटॅक, बचावासाठी डॉक्टरांनी सांगितला एक खास उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 10:32 AM2022-12-15T10:32:16+5:302022-12-15T10:33:18+5:30
How to Prevent Heart Attack: कमी वयात हार्ट अटॅक येण्याच्या घटनांनी लोकांची चिंता वाढली आहे आणि लोक यापासून बचावाचे उपाय शोधत आहेत. अशात डॉक्टर्स आणि हार्ट स्पेशलिस्ट लोकांनी लाइफस्टाईल बदलण्याचा आणि फिजिकली अॅक्टिव राहण्याचा सल्ला देत आहेत.
How to Prevent Heart Attack: रस्त्याने चालताना, डान्स करताना किंवा एक्सरसाइज करताना हार्ट अटॅक (Heart Attack) येण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटनांमुळे हळूहळू भितीही वाढत आहे. कमी वयात हार्ट अटॅक येण्याच्या घटनांनी लोकांची चिंता वाढली आहे आणि लोक यापासून बचावाचे उपाय शोधत आहेत. अशात डॉक्टर्स आणि हार्ट स्पेशलिस्ट लोकांनी लाइफस्टाईल बदलण्याचा आणि फिजिकली अॅक्टिव राहण्याचा सल्ला देत आहेत.
बचावासाठी डॉक्टरांचा 1 सल्ला
हार्ट अटॅक (Heart Attack) पासून बचावासाठी डॉक्टरांनी लाइफस्टाईलमध्ये सुधारणा आणि बॅलन्स्ड डाएटशिवाय ब्रिस्क वॉक करण्याचा सल्ला दिला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की, हृदय हेल्दी ठेवण्यासाठी ब्रिस्क वॉक फार चांगला आहे. ज्यामुळे वजन कमी होण्यासोबतच हृदयही मजबूत राहतं.
काय आहे ब्रिस्क वॉक आणि कसा करावा लागतो?
ब्रिस्क वॉक (Brisk Walk) नॉर्मल वॉकपेक्षा जरा वेगळा असतो. यादरम्यान एका मिनिटात तुम्हाला 100 पावलं चालायचे असतात. ब्रिस्क वॉक काउंट करण्यासाठी तुम्ही स्टेप काउंटर, स्मार्टवॉच किंवा मोबाइल अॅपचा वापर करू शकता.
ब्रिस्क वॉक दरम्यान करू नका ही चूक
डॉक्टरांनी सांगितलं की, ब्रिस्क वॉक (Brisk Walk) दरम्यान स्पीड योग्य ठेवावा. स्पीड कमी केल्यास फायदा होणार नाही. जर स्पीड जास्त ठेवत असाल तर इतर समस्या होऊ शकते. त्याशिवाय वॉक करताना चांगल्या फुटवेअरचा वापर करा.
ब्रिस्क वॉक करण्याचे फायदे
ब्रिस्क वॉक (Brisk Walk) केल्याने तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. ब्रिस्क वॉकने एक्स्ट्रा वजन कमी होतं आणि कॅलरी बर्न होतात. त्याशिवाय लीन मसल्स वाढतात आणि मूडही चांगला राहतो. तसेच ब्रिस्क वॉकने ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरही कंट्रोल राहतं. ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.