मोठा दिलासा! कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार

By manali.bagul | Published: September 27, 2020 09:49 AM2020-09-27T09:49:14+5:302020-09-27T09:51:06+5:30

CoronaVirus News & Latest Updates : या अँटिबॉडीजमुळे आता लस लवकर तयार करण्यास मदत होईल, असा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात  आला आहे.

Britain to become who largest state donor with 30 percent funding increase for corona virus | मोठा दिलासा! कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार

मोठा दिलासा! कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार

Next

 कोरोना व्हायरसनं आतापर्यंत जगभरातील दोन कोटींपेक्षा जास्त लोकांना संक्रमित केलं आहे. कोरोनाची लस कधी येणार याची संपूर्ण जग प्रतिक्षा करत आहे. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस तयार  करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. दरम्यान कोरोनाच्या संक्रमणाबाबत एक सकारात्मक माहिती समोर आली आहे.  कोरोनाशी  लढणाऱ्या नव्या प्रभावी अँटिबॉडी शास्त्रज्ञांना सापडल्या आहेत. या अँटिबॉडीजमुळे आता लस लवकर तयार करण्यास मदत होईल, असा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात  आला आहे.

एक्टिव्ह लस असेल तर लसीचा डोस दिल्यानंतर शरीरात अँटिबॉडी तयार व्हाव्या लागतात. या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. तर पॅसिव्ह लशींमध्ये अ‍ॅक्टिव्ह अँटिबॉडीज रुग्णांना आधीच दिल्या जातात. त्यामुळे याचा परिणाम तुलनेने लवकर दिसतो.  सेल या जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. जर्मन सेंटर फॉर न्युरोडिजनरेटिव्ह डिसीज आणि चारिटे यूनिव्हर्सिटीस मेडिसिन बर्लिनच्या  संशोधकांनी  कोरोनाशी लढा देत असलेल्या रुग्णांच्या रक्तातून वेगवेगळ्या  600 एंटिबॉडी शोधल्या.  प्रयोगशाळेतील तपासणीत वैज्ञानिकानी त्यातून कोरोनाप्रतिकारक अक्टिव्ह अँटिबॉडीजला ओळखून या अँटिबॉडीज  प्रभावी लस तयार करायला खुप उपयोगात येतील असा निष्कर्ष काढला.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार आकार लहान असल्यामुळे हे मॉलेक्यूल्स कोरोनाला निष्क्रीय करण्यासाठी पेशींची क्षमता वाढवण्यासाठी प्रभावी ठरतील. ही लस माणसांच्या  पेशींशी जोडली जात नाही हा एक चांगला संकेत आहे, त्यामुळे या लसीचे साईड इफेक्ट्स नगण्य आहेत. अँटीबॉडी शरीराला आजाराशी लढण्यासाठी फायदेशीर ठरतात. हॅमस्टरच्या संशोधनानुसार लागण झाल्यानंतर अँटिबॉडी दिल्यास सौम्य लक्षणं जाणवू शकतात. जर संसर्गाच्या आधी त्या दिल्या तर लक्षणं दिसत नाहीत, असं संशोधन प्रकल्पाचे समन्वयक जाकोब क्रेय यांनी सांगितले आहे.

मोम्सन रिनके यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामधून बर्‍या झालेल्या रुग्णांच्या अँटिबॉडी दिल्या जातात. सर्वात प्रभावी एंटिबॉडीजचं नियंत्रित स्वरूपात निर्माण केलं जातं.  तीन अँटिबॉडीज क्लिनिकल ट्रायलसाठी आशादायी असल्याचं या प्रकल्पाचे हेरिटेज प्रीसियस यांनी सांगितले आहे. दरम्यान एंटीबॉडीजद्वारे आतापर्यंत अनेक आजारांच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे हे संशोधन कोरोनाच्या माहामारीत आशेचा किरण दाखवणारं ठरलं  आहे. 

फ्लू आणि कोविड १९ एकत्र उद्भवल्यास मृत्यूचा धोका दुप्पट

'पब्लिक हेल्थ इंग्लँड' (PHE) च्या रिपोर्टनुसार या दोन्ही इन्फेक्शनमुळे मृत्यूचा धोका दुप्पटीने वाढतो. याशिवाय तज्ज्ञांनी हिवाळ्यात या आजारांचा धोका वाढणार असल्याची सुचना देण्यात आली होती.   या रिपोर्टनुसार दोन्ही इन्फेकशन्स एकाचवेळी उद्भवल्यास रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाला निरोगी  रुग्णाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी धोका जास्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. ब्रिटनमध्ये याचवर्षी सगळ्यात मोठं लसीकरण केलं जाणार आहे. 'द गार्डियन' ने यासंदर्भातील माहिती दिली होती. 

एखाद्या व्यक्तीला फ्लू आहे की कोरोनाचं संक्रमण याची काळजी घ्यावी लागेल. PHE च्या रिपोर्टनुसार देशात २० जानेवारी ते २५ एप्रिल या कालावधीत एकूण २० हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अनेकांना रुग्णाला फ्लू आणि कोरोना व्हायरस या दोन्ही समस्या उद्भवल्या होत्या. यातील जास्तीत जास्त रुग्णांची स्थिती गंभीर होती. ४३ टक्के लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्याचं प्रमाण २७ टक्के होतं. 

फ्लू एक व्हायरल इन्फेक्शन आहे. जे खोकण्यातून किंवा शिंकण्यातून पसरतं. कोविड १९ सुद्धा असाच पसरतो. फ्लूने संक्रमित असलेला व्यक्ती जवळपास एका आठवड्यानंतर बरा होतो. पण कोविड १९ असलेल्या व्यक्तीला या आजारातून बाहेर येण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो.  दरम्यान या दोन्ही आजारांमुळे ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या  लोकांच्या जीवाला धोका असतो.   हिवाळ्याच्या वातावरण फ्लू जास्त पसरतो.  कोरोनाबाबत सांगता येणं कठीण आहे. पण दोन्ही आजारांची लक्षणं सारखीच आहेत. वैद्यकिय तपासणी केल्याशिवाय यातील फरक ओळखणं कठीण आहे.

हे पण वाचा-

डेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा

CoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका

वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान

दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...

Web Title: Britain to become who largest state donor with 30 percent funding increase for corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.