कोविड19 वर स्वस्त उपचार शोधण्यात हा देश सगळ्यात पुढे; चाचणीदरम्यान 'या' औषधानं केली कमाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 06:24 PM2020-07-26T18:24:01+5:302020-07-26T18:26:38+5:30
ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ टायलर कोवेन यांनी नमुद केले आहे की कोरोनाच्या माहामारीच्या या लढ्यात संशोधकांचे कौतुक करायला हवे.
जगभरात आता १०० पेक्षा जास्त देश कोरोनाच्या माहामारीशी लढण्यासाठी लस शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. कोरोनाच्या लसीच्या शर्यंतीत ब्रिटन सगळ्यात पुढे आहे. रँडमाइज्ड या औषधाच्या चाचणीनंतर आता ब्रिटनच्या संशोधकांच्या प्रयत्नांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञ टायलर कोवेन यांनी नमुद केले आहे की कोरोनाच्या माहामारीच्या या लढ्यात ब्रिटनच्या संशोधकांचे कौतुक करायला हवे.
कोरोनाशी लढण्यासाठी औषध आणि लस विकसित करण्यासाठी एक अभियान सुरू केलं आहे. या अभियानात ३ हजारांपेक्षा जास्त डॉक्टरर्स आणि नर्सेसच्या मदतीने १२ हजारांपेक्षा जास्त कोरोना संक्रमित रुग्णांचे १७६ रुग्णालयांमध्ये उपचार केले जात आहेत. हे परिक्षण गंभीर स्वरुपात आजारी असलेल्या आयसीयुवरील रुग्णावर करण्यात येत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
अशा स्थितीत कोरोना रुग्णांना उपचार घेणं खूप माहागात पडत आहे. कारण गोळ्या औषधं, इंजेक्शन्स यांच्या किमती खूप जास्त आहेत. रँडमाइज्ड औषधाच्या तंत्राने कोरोनाचे स्वस्त उपचार शोधले आहेत. हे औषध प्रभावी असून जास्त महागडे नसल्यामुळे इतर देश याबाबतीत ब्रिटनशी तुलना करू शकत नाही असं तज्ज्ञांचे मत आहे.
ऑक्सफोर्ड युनिव्हरर्सिटीचे मार्टीन लँडर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेले चार महिने हे खूपच असामान्य होते. स्थितीत ब्रिटनमध्ये कोरोनाचं स्वस्त औषध तयार करण्याचा प्रयत्न ब्रिटनचे तज्ज्ञ करत आहेत. या प्रयोगासाठी रुग्णांचे प्रोटोकॉल तयार करण्यासाठी दोन संशोधकांना ९ दिवसांचा कालावधी लागला. साधारणपणे या प्रक्रियेसाठी नऊ महिने लागतात. संशोधक हॉर्बी यांनी सांगितले की, आठ आठवड्यांच्या आत १० हजारापेक्षा जास्त रुग्णांना भरती करून घेण्यात आलं होतं. या औषधाच्या वापरामुळे चाचणीला गती प्राप्त झाली. याशिवाय रुग्णांना कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स दिसून आले नाहीत.
दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा १३ लाख ८५ हजार ५२२ वर पोहोचला आहे. यापैकी ३२ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ लाख ८५ हजार ५७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४ लाख ६७ हजार ८८२ जणांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनानंतर आता 'या' देशात नवीन संकट; ६०० लोकांना झाली आजाराची लागण
काळजी वाढली! कोरोना संक्रमणातून बाहेर आल्यानंतरही पाठ सोडणार नाहीत 'या' समस्या