Budget 2021 : कोरोना वॅक्सीनेशनसाठी बजेटमध्ये ३५ हजार कोटी रूपये, किती लोकांना फ्री मिळेल वॅक्सीन?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 03:49 PM2021-02-01T15:49:04+5:302021-02-01T15:49:41+5:30
Budget 2021 : आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामण म्हणाल्या की, देश फार मोठ्या महामारीतून बाहेर आला आहे.
Budget 2021 : सरकारने कोरोना वॅक्सीनेशनसाठी २०२१-२२ च्या बजेटमध्ये ३५ हजार कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली आहे. या निधीतून किती लोकांना फ्रीमध्ये वॅक्सीन दिली जाईल हे जाणून घेऊ. आतापर्यंत कोरोना वॅक्सीन फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.
आपल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामण म्हणाल्या की, देश फार मोठ्या महामारीतून बाहेर आला आहे. त्यांनी बजेटमध्ये कोरोना वक्सीनसाठी ३५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. तर आरोग्यावर एकूण २.४ लाख कोटी खर्च करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ८० कोटी लोकांना कोरोना वॅक्सीन दिल्यास ५६ हजार ते ७२ हजार कोटी रूपये खर्च येऊ शकतो. भारतीय स्टेट बॅंकच्या रिसर्च टीमने केलेल्या एका रिसर्च रिपोर्टमध्ये हा अंदाज लावण्यात आला आहे. (हे पण वाचा : Budget 2021: तिजोरी भरण्यासाठी मोदी सरकार काय काय विकणार?; पाहा संपूर्ण यादी)
एसबीआयचं मत आहे की, एक व्यक्तीला वॅक्सीन लावण्यासाठी ७०० ते ९०० रूपये खर्च येऊ शकतो. म्हणजे यावेळी वॅक्सीनसाठी जी रक्कम देण्यात आली आहे त्यातून ३० ते ५० कोटी लोकांना वॅक्सीन लावली जाऊ शकते. पहिल्या टप्प्यात सरकारने एकूण ३० कोटी लोकांना वॅक्सीन देण्याची व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे. दुसऱ्या टप्प्यात सरकार ५० कोटी इतर लोकांना वॅक्सीन देण्याची तयारी करेल. यासाठी सरकारला ३५ हजार ते ४५ हजार कोटी रूपये खर्च करावे लागतील. (हे पण वाचा : Budget 2021, Home Loan: गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; Interest Payment सवलतीला १ वर्षाची मुदतवाढ)
३० कोटींना प्राधान्य
दरम्यान, भारतात सध्या दोन वॅक्सीनच्या वापराला परवानगी मिळाली आहे. पहिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड आणि दुसरी भारत बायोटेकची कोवॅक्सिन आहे. सरकार ऑगस्ट २०२१ पर्यंत ३० कोटी लोकांना वॅक्सीन देणार आहे. आणि २०२२ च्या शेवटपर्यंत ५० कोटी लोकांना वॅक्सीन दिली जाईल. (हे पण वाचा : Budget 2021, Income Tax Slabs : करदात्यांना दिलासा नाहीच; 'इन्कम टॅक्स स्लॅब' जैसे थे!)
कसा निघाला खर्चाचा अंदाज
एसबीआयचा अंदाज आहे की, सीरम इन्स्टिट्यूटची वॅक्सीन कोविशील्ड सरकारला २५० ते ३०० रूपये प्रति डोज मिळेल आणि प्रत्येक डोजच्या लावण्यापर्यंतचा प्रशासनिक खर्च १०० ते १५० रूपये असेल. अशाप्रकारे एका व्यक्तीला वॅक्सीन देण्याचा एकूण खर्च ७०० ते ९०० रूपये येऊ शकतो.