​लोणी वाटते तेवढे वाईट नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2016 11:28 AM2016-07-05T11:28:20+5:302016-07-05T16:58:20+5:30

बटर आणि हृदयविकार यांचा थेट असा कोणताच संबंध दिसून आला नाही.

Butter is not as bad as it sounds! | ​लोणी वाटते तेवढे वाईट नाही!

​लोणी वाटते तेवढे वाईट नाही!

Next
टर’ (लोणी) शिवाय अनेक जणांची भूक भागतच नाही. पण बटर आपल्या आरोग्याला हानीकारक असून हृदयविकारासदेखील कारणीभूत ठरू शकते असे मानले जायचे.

परंतु ‘प्लॉस’ने प्रकाशित केलेल्या एका नव्या संशोधनानुसार बटर आणि हृदयविकार यांचा थेट असा कोणताच संबंध दिसून आला नाही. हृदयासंबंधी आजारांमुळे अमेरिके त सर्वाधिक मृत्यू होतात.

एवढेच नाही तर सर्वांना आश्चर्य करत या संशोधनात असे सांगितले आहे की, एक चमचा लोणी खाल्ल्याने मधुमेहाचा होण्याची शक्यता चार टक्क्यांनी कमी होते. पण असे जरी असले तरी आपण जास्त बटर खावे असे मुळीच नाही.

बटर जरी हानीकारक नसले तरी आपण ते कशासोबत खातो हे महत्त्वाचे आहे. बटर सहसा स्टार्च, चरबीयुक्त, गोड पदार्थांसोबत सर्वाधिक खाल्ले जाते. असे करणे खरोखरंच आजारांना खुल आमंत्रण आहे.

आत कोणतेच अध्ययन शंभर टक्के अचुक नसते. अपवाद किंवा चुकीसाठी नेहमी जागा असते. पण या संशोधनाच्या बाबतीत मात्र असे म्हणता येणार नाही. कारण या संशोधनामध्ये १५ देशांतील पाच लाखांपेक्षा जास्त लोकांचा अभ्यास करण्यात आला. याचाच अर्थ की, थोडे पथ्ये पाळले तर बटर खाण्यास हरकत नसावी, नाही का?

Web Title: Butter is not as bad as it sounds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.