हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उन्हाळ्यातील बेस्ट उपाय, हार्ट अटॅकचा धोका होईल कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:39 PM2023-03-02T12:39:52+5:302023-03-02T12:42:09+5:30
Cholesterol Lowering Diet : पॅक्ड मिल्क प्रोडक्टऐवजी एका ग्लास छास नेहमीच फायदेशीर ठरतं. अनेकांना माहीत नसेल पण छास पिऊन तुम्ही हार्ट अटॅकचा धोकाही कमी करू शकता. कसा तो जाणून घेऊ...
Cholesterol Lowering Diet : छासपासून आरोग्याला होणारे फायदे काही आपल्यासाठी नवीन नाहीत. जेव्हा आपल्याला हायड्रेटेड राहण्याची आणि उन्हाळ्यात उष्णतेचा सामना कराचा असतो तेव्हा हे सगळ्यांचं आवडतं पेय असतं. याच्या अनेक गुणांमुळे लोक याचं वर्षभर सेवन करतात. लोक जेवताना एक ग्लास छास नक्कीच पितात. पॅक्ड मिल्क प्रोडक्टऐवजी एका ग्लास छास नेहमीच फायदेशीर ठरतं. अनेकांना माहीत नसेल पण छास पिऊन तुम्ही हार्ट अटॅकचा धोकाही कमी करू शकता. कसा तो जाणून घेऊ...
छास प्यायल्याने कमी होतं बॅड कोलेस्ट्रॉल
शरीरात वाढणारं बॅड कोलेस्ट्रॉल अनेक गंभीर समस्या तयार करतं. यामुळे हाय बल्ड प्रेशर (High Blood Pressure), डायबिटीस (Diabetes), लठ्ठपणा (Obesity), हार्ट अटॅक (Heart Attack), कोरोनरी आर्टरी डिजीज (Coronary Artery Disease) आणि ट्रिपल वेसल डिजीज (Triple Vessel Disease) चा धोका असतो. अशात छास नक्की प्या.
कसं कराल तयार?
- अर्धा कप दही
- दीड कप पाणी
- अळशीच्या बीया
- जिरं
- मेथीच्या बीया
1) सगळ्यात आधी दही आणि पाणी चांगल्या प्रकारे एकत्र मिक्स करा.
2) आता समान प्रमाणात अळशीच्या बीया, जिरं आणि मेथीचे दाने घेऊन बारीक करा.
3) शेवटी छास एका ग्लासमध्ये टाका आणि त्यात एक चमचा अळशी, जिरं आणि मेथीचं मिश्रण टाकून चांगलं मिक्स करा.
4) तुम्ही दुपारच्या जेवणानंतर तीन ते चार वाजता याचं सेवन करू शकता. याने वजन कमी करण्यास आणि हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यास नक्की मदत मिळेल.