जोर लावूनही पोट साफ होत नाही? ताकामध्ये 'या' दोन गोष्टी टाकून करा सेवन, मग बघा कमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 11:54 AM2024-10-09T11:54:30+5:302024-10-09T11:54:53+5:30

Constipation : काही गोष्टींमुळे पचन तंत्रावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आहारात फायबरची कमतरता. 

Buttermilk, jeera and Ajwain home remedies for constipation | जोर लावूनही पोट साफ होत नाही? ताकामध्ये 'या' दोन गोष्टी टाकून करा सेवन, मग बघा कमाल!

जोर लावूनही पोट साफ होत नाही? ताकामध्ये 'या' दोन गोष्टी टाकून करा सेवन, मग बघा कमाल!

Buttermilk remedies for constipation problems: आजकाल चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीची लाइफस्टाईल यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेच्या समस्येचा सामना करावा लागतो. काही गोष्टींमुळे पचन तंत्रावर नकारात्मक प्रभाव पडतो आणि यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होते. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आहारात फायबरची कमतरता. 

जंक फूड, फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूडमुळे शरीराला फायबर मिळत नाही. फायबर आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी फार महत्वाचं असतं. तसेच याने बद्धकोष्ठतेची म्हणजे पोट साफ न होण्याची समस्याही लगेच दूर होते. तसेच फायबरने पचन तंत्रही चांगलं राहतं. 

अशात हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करून तुम्ही बद्धकोष्ठतेची समस्या दूर करू शकता. यावर आज आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या लोकांनी ताकामध्ये जिरे आणि ओवा टाकून सेवन करणं फायदेशीर ठरतं. ताक, जिरे आणि ओवा यांच्या कॉम्बिनेशनने पचन तंत्र चांगलं राहतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी केली जाऊ शकते. या मिश्रणाने गॅस, अपचन आणि पोटासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते.

कसं कराल तयार?

एक ग्लास ताक घ्या. यात एक चमचा भाजलेलं जिरे पाडवर आणि अर्धा चमचा ओवा पावडर टाका. यात चिमुटभर मीठ टाका. याने ताकाची टेस्ट चांगली होईल. या गोष्टी चांगल्या मिक्स करून सकाळी आणि दुपारी जेवण झाल्यावर सेवन करू शकतं. 

कसा होतो फायदा?

ताकामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात. जे पचन तंत्रात गुड बॅक्टेरियाचं संतुलन कायम ठेवततात. याने पोटाला थंडावा मिळोत आणि आतड्यांचा आरोग्य चांगलं राहतं.

जिऱ्यामध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात जे गॅस आणि अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात. याने पचनासाठी फायदेशीर एंझाइम सक्रिय होतात, ज्यामुळे पचनक्रिया चांगली होते.

ओव्यामध्ये थायमॉल नावाचं तत्व असतं. जे पचनासाठी फायदेशीर असतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतं.

या मिश्रणाचं सेवन नियमितपणे केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या हळूहळू कमी होते. हा एक नॅचरल उपाय आहे. मात्र, जर बद्धकोष्ठतेची समस्या अधिक गंभीर असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

Web Title: Buttermilk, jeera and Ajwain home remedies for constipation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.