स्कीन सिरम खरेदी करत आहात ? आधी हे वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 04:24 PM2022-11-04T16:24:05+5:302022-11-04T16:28:30+5:30

आपल्यापैकी बहुतेक जण हे त्वचा मुलायम राहावी म्हणुन वेगवेगळे प्रोडक्ट्स खरेदी करतात आणि ते लावतात. ज्याला  कॉस्मेटीक भाषेत स्कीन ...

Buying a skin serum? Read this first... | स्कीन सिरम खरेदी करत आहात ? आधी हे वाचा...

स्कीन सिरम खरेदी करत आहात ? आधी हे वाचा...

Next

आपल्यापैकी बहुतेक जण हे त्वचा मुलायम राहावी म्हणुन वेगवेगळे प्रोडक्ट्स खरेदी करतात आणि ते लावतात. ज्याला  कॉस्मेटीक भाषेत स्कीन सिरम म्हणतात. हे सिरम त्वचेत अगदी आतपर्यंत मुरते. जर तुम्हाला त्वचेचे गंभीर विकार असतील तर स्किन टोनिंग नंतर तुम्ही सिरम वापरु शकता. यामुळे पिंपल्स, एक्ने , ब्लॅकहेड्स सारख्या समस्यांपासून तुम्ही दुर राहाल. मात्र या सीरमचा वापर करण्यापुर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 

त्वचेचा प्रकार

आपल्यापैकी प्रत्येकाचीच त्वचा ही सारखी नसते. कोणाची कोरडी तर कोणाची तेलकट अशी असते. तुमच्या त्वचेला नेमके काय योग्य आहे हे बघूनच सीरम किंवा इतर कॉस्मेटीक प्रोडक्ट्स निवडायला हवी. ऑईली स्किन फ्रेंडली आणि ड्राय स्कीन फ्रेंडली असे सीरम बाजारात मिळतात. सीरम कोणत्या त्वचेसाठी आहे हे वाचुनच खरेदी करा. चुकीचे सीरम वापरल्यास अॅलर्जी होण्याचीही शक्यता असते.

त्वचा विकार

तुम्हाला जर काही त्वचेचे विकार असताील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सीरम किंवा इतर प्रोडक्ट्स खरेदी करा. त्वचेचे विकार वाढणार नाहीत अशाच सीरमचा वापर करावा. सीरममध्ये केमिकल्सचा समावेश असतो. हे केमिकल्स प्रत्येकालाच अनुकुल असतील असे नाही. 

वयानुसार सीरम निवडा

वाढत्या वयानुसार त्वचेच्या तक्रारीही सुरु होत असतात. यासाठी ऍंटीएजिंग सिरमचा अनेकजण वापर करतात. मात्र म्हातारपणी त्वचा सहसा मऊ होत जाते. तेव्हा कोणत्याच सिरमची गरज पडत नाही. 

Web Title: Buying a skin serum? Read this first...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.