कोबीच्या भाजीतील 'हा' किडा ठरू शकतो घातक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 02:35 PM2018-11-30T14:35:05+5:302018-11-30T14:35:15+5:30
फळभाज्यांमध्ये समाविष्ट होणारी कोबीची भाजी घरघरांमध्ये अगदी सर्रास बनवली जाते. कोबीचे शरीराला होणारे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. यामुळे अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होण्यास मदत होते.
फळभाज्यांमध्ये समाविष्ट होणारी कोबीची भाजी घरघरांमध्ये अगदी सर्रास बनवली जाते. कोबीचे शरीराला होणारे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. यामुळे अनेक आजारांपासून शरीराचे रक्षण होण्यास मदत होते. यामध्ये आयर्न, फायबर आणि व्हिटॅमिन यांसारखी अनेक पोषक तत्व आढळून येतात. याव्यतिरिक्त यामध्ये व्हिटॅमिन बी1, बी6, के, ई, सी आणि सल्फरही मुबलक प्रमाणात आढळते जे शरीरासाठी लाभदायक असते. यामध्ये फार कमी प्रमाणात कॅलरी आढळून येतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनी कोबीचा डाएटमध्ये समावेश करणं फायदेशीर ठरतं. परंतु या भाजी अनेकदा शरीराला नुकसानदायकही ठरते. या भाजीमध्ये एक कीडा आढळून येतो. जो तुमच्या पोटासोबतच तुमच्या मेंदूसाठीही धोकादायक ठरतो.
कोबीमध्ये असतो टॅपवार्म किडा
कोबीमध्ये टेपवार्म (tapeworm) नावाचा एख किडा असतो. अनेक शेतकरी त्याला कोबीचा किडा म्हणून ओळखतात. हा किडा कोबीसोबतच इतरही अनेक भाज्यांमध्ये आढळून येतो. हा किडा फक्त कोबीवरच नाही तर ब्रोकोली, फ्लॉवर, ब्रसेल्स स्प्राउट्स, मोहरी, मूळा यांसारख्या भाज्यांवर आढळून येतो.
या भाज्या योग्यप्रकारे स्वच्छ केल्याशिवाय त्यांच्या जेवणात वापर केल्याने हे किडे शरीरात प्रवेश करू शकतो. ज्यामुळे शरीराच्या अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच डॉक्टर नेहमी पालेभाज्या व्यवस्थित धुवून खाण्याचा सल्ला देतात. पण भाज्या धुतल्याने इतर किडे निघून जातात. पण तरिही तुम्हाला शंका असेल तर या भाज्या शिजवूनच खा.
किडे पोटासोबतच मेंदूसाठी ठरतात हानिकारक
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे हे किडे शरीरामध्ये 82 फूटांपर्यंत जाऊ शकतात. एवढचं नव्हे तर हे किडे शरीरामध्ये 30 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. जेव्हा हे किडे पोटामध्ये जातात, तेव्हा शरीराला फारशा समस्यांचा सामना करावा लागत नाही. कधीतरी तुम्हाला पोटाच्या तक्रारींचा सामना करावा लागू शकतो. पण या किड्यांची अंडी जर तुमच्या मेंदूपर्यंत गेली तर मात्र हे तुमच्यासाठी फार धोकादायक ठरतं. यामुळे न्यूरोसाइटुस्टिकोसिस नावाचा गंभीर आजार होऊ शकतो.
अर्धांगवायूचा धोका
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, कोबी आणि प्लॉवरच्या भाजीमध्ये किडे फार लहान असतात. जे सहजपणे दिसतही नाहीत. या किंड्यावर कोणताही परिणाम होत नाही. हो कोणत्याही परिस्थितीमध्ये जिवंत राहू शकतात. पोटातील अॅसिड आणि एंजाइमचाही या किंड्यावर फारसा परिणाम होत नाही. जसे हे किडे मेंदूमध्ये जातात त्यावेळी त्या रूग्णाला अर्धांगवायूचे झटके येऊ लागतात. याकडे दुर्लक्ष केले किंवा ऑपरेशनकरण्यास उशीर केला तर शरीराला फार गंभीर परिणामांचा सामना करावा लागतो.
कोबीच्या किंड्यापासून अशी करा सुटका
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फ्लॉवर आणि कोबी सारख्या इतर भाज्यांची मोठी पानं काढून तुम्ही ती भाजी वापरू शकता. याव्यतिरिक्त भाज्यांवर कॉर्नमीलची (cornmeal) फवारणी करा. ज्यामुळे भाज्यांमध्ये असलेले हे किडे मरून जातात. कोबीवरील या किंड्यापासून सुटका करण्यासाठी दुसरा एक मार्ग म्हणजे तुम्ही भाजी करण्याआधी भाजी चिरून त्यावर पिठ शिंपडून ठेवू शकता. त्यामुळे हे किडे डिहायड्रेट होतात.