एक्सरसाइजआधी कॉफी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 10:43 AM2019-04-23T10:43:14+5:302019-04-23T10:47:13+5:30

कॉफी प्यायल्याने आपल्याला फ्रेश तर वाटतंच सोबतच याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशनला कॅफीन मिळतं. कॅफीन शरीरात जाऊन आपली सतर्कता वाढवतं.

Caffeine can improve exercise performance | एक्सरसाइजआधी कॉफी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क!

एक्सरसाइजआधी कॉफी पिण्याचे फायदे वाचून व्हाल थक्क!

googlenewsNext

(Image Credit : Medical Xpress)

कॉफी जगातल्या सर्वाच लोकप्रिय पेयांपैकी एक आहे यात अजिबातच दुमत नाही. कॉफी प्यायल्याने आपल्याला फ्रेश तर वाटतंच सोबतच याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशनला कॅफीन मिळतं. कॅफीन शरीरात जाऊन आपली सतर्कता वाढवतं, एकाग्रता वाढवतं, समस्या सोडवण्याची क्षमता, स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं. एका शोधानुसार, कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे शारीरिक आणि मानसिक प्रदर्शन सुधारतं. एक्सरसाइज करण्याआधी कॉफी प्यायल्याने तुम्ही अधिक वेळ एक्सरसाइज करु शकता. चला जाणून घेऊ एक्सरसाझज करण्याआधी कॉफी पिण्याचे फायदे. 

१) चरबी कमी करते - कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमुळे आपल्या शरीरात एक्स्ट्रा फॅट कमी करण्यास मदत मिळते. एक्सरसाइज करण्याआधी कॉफी प्यायल्याने फॅट सेल्सचा ग्लायकोजन विरोधासाठी एक ऊर्जा स्त्रोत म्हणूण वापर करते. 

२) वेदना कमी होतात - एक्सरसाइज केल्यावर सामान्यपणे अनेकांच्या मांसपेशींमध्ये वेदना होतात. जे लोक एक्सरसाइज करण्यापूर्वी कॉफीचं सेवन करतात, त्यांना मांसपेशीमध्ये कमी वेदना होतात. कॉफी विशेष रुपाने एथलीटोंच्या मांसपेशीमध्ये इंधनासारखं काम करते. 

३) ब्लड सर्क्युलेशनमध्ये फायदा - जे लोक नियमितपणे कॉफी सेवन करतात त्यांचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. याचं कारण आहे की, कॅफीन ऊर्जेत संतुलन राखणाऱ्या एड्रेनॉलिनची निर्मिती वाढवते. त्यासोबतच मांसपेशी आणि हार्टमध्ये ब्लड सर्क्युलेशनमध्ये सुधारणा होते. 

४)  फोकस वाढवण्यास सहायक - कठिण एक्सरसाइज करण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी आणि मेंटल फोकसची गरज असते. कारण या दोन्हीमुळे आपली एक्सरसाइज जास्त प्रभावी आणि फायदेशीर होते. ब्लॅक कॉफी प्यायल्याने या दोन्हींची गरज भरुन निघते. तसेच कॉफी पिणाऱ्यांची स्मरणशक्तीही चांगली वाढते.

५) रोगांपासून सुरक्षा - एक्सरसाइज करण्यासाठी फिट राहणे फार गरजेचे आहे. कॉफी पिण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती फार वाढते. जेव्हा तुम्ही रोगांपासून दूर रहाल तर अधिक चांगली एक्सरसाइज करु शकाल. 

ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे

कॉफीमध्ये असलेलं कॅफेन आपल्या मेंदूमधील डोपामीनची लेवल वाढवतं. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता यांसारख्या मेंदूशी जोडलेल्या क्रिया चांगल्या होतात. तसेच यामुळे तुमची एनर्जी लेव्हलही वाढते. 

ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी मदत करते. कॅफेन शरीरातील मेटाबॉलिकचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर बर्न होतात. तसेच ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन लवकर घटवण्यासाठीही मदत होते. 

ब्लॅक कॉफीमध्ये अ‍ॅंन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमिन, मिनरल्स यांसारख्या गोष्टी अस्तित्वात असतात. अ‍ॅंन्टीऑक्सिडंट हेल्थशी संबंधित जुन्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. तसेच कॅन्सरच्या समस्या दूर करण्यास मदत करते. 

ब्लॅक कॉफी मधुमेहाच्या सर्व शक्यता दूर करण्यास मदत करतं. . तसेच हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही मदत करतं. ब्लॅक कॉफीच्या सेवनाने शरीरातील इंसुलिनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं.)

Web Title: Caffeine can improve exercise performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.