दूध-दही-पनीरच कशाला? 'या' भाज्यांमधूनही मिळतं भरपूर कॅल्शिअम, सगळी हाडं होतील मजबूत!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 10:36 AM2024-11-06T10:36:58+5:302024-11-06T10:37:50+5:30

Calcium Reach Food : जास्तीत जास्त लोक कॅल्शिअम मिळवण्यासाठी दही, दूध, पनीर या पदार्थांवर पैसे खर्च करतात. जर तुम्हाला यांचं सेवन न करता कॅल्शिअम मिळवायचं असेल तर काही भाज्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Calcium Reach Food : These foods have more calcium than milk and paneer | दूध-दही-पनीरच कशाला? 'या' भाज्यांमधूनही मिळतं भरपूर कॅल्शिअम, सगळी हाडं होतील मजबूत!

दूध-दही-पनीरच कशाला? 'या' भाज्यांमधूनही मिळतं भरपूर कॅल्शिअम, सगळी हाडं होतील मजबूत!

Calcium Reach Food : शरीराला अनेक पोषक तत्वांची गरज असते. याने शरीर तर फीट राहतंच, सोबतच आरोग्यही चांगलं राहतं. कॅल्शिअम आणि प्रोटीन त्यातील महत्वाचे पोषक तत्व आहेत. हे मिळण्यासाठी कशाचं सेवन करावं याबाबत लोक कन्फ्यूज असतात. जास्तीत जास्त लोक कॅल्शिअम मिळवण्यासाठी दही, दूध, पनीर या पदार्थांवर पैसे खर्च करतात. जर तुम्हाला यांचं सेवन न करता कॅल्शिअम मिळवायचं असेल तर काही भाज्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यातून तुम्ही शरीरातील कॅल्शिअमची कमतरता भरून काढू शकता. ज्यामुळे शरीरातील सगळी हाडं मजबूत राहतील.

कॅल्शिअम मिळवण्यासाठी काय खावे?

कॅल्शिअमने केवळ हाडे मजबूत होतात असं नाही तर आरोग्य चांगलं ठेवण्यातही याची महत्वाची भूमिका असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार कॅल्शियम भरपूर असलेले फूड्स खाऊन ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी केला जाऊ शकतो.

चिया सीड्स

चिया सीड्समध्ये कॅल्शिअमचं प्रमाण भरपूर असतं. सोबतच यात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि प्रोटीनही भरपूर असतं. इतकंच नाही तर या बियांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, फायबर आणि इतरही अनेक पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

बरबटी

बरबटी किंवा कोणत्याही पांढऱ्या दाण्यांमध्ये कॅल्शिअमचं प्रमाण अधिक असतं. तसेच यात प्रोटीन, फायबर आणि इतरही आवश्यक तत्व मिळतात. याचं नियमित सेवन केल्यास हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.

ब्रोकली

ब्रोकलीमध्येही कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतं आणि याने मास्यांमधून मिळणाऱ्या अनेक पोषक तत्वांची कमतरता भरून निघण्यास मदत मिळते. ब्रोकलीमध्ये प्रोटीनही आढळतं. त्यामुळे तुम्हाला प्रोटीनसाठी केवळ मांस खाण्याची गरज नाही.

भेंडी

भेंडीमधून शरीराला कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम मिळते. हे दोन्ही तत्व हाडं मजबूत करण्यासाठी आणि हाडांसंबंधी समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. या भाजीचं नियमित सेवन केल्याने हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहतं.

Web Title: Calcium Reach Food : These foods have more calcium than milk and paneer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.