हात-पायांमध्ये होतात वेदना, कॅल्शिअमची असू शकते कमी; लगेच खाणं सुरू करा 'या' गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 09:55 AM2024-04-04T09:55:55+5:302024-04-04T09:56:34+5:30
Calcium Deficiency: हात-पायांमध्ये वेदना किंवा सतत अंगदुखी होत असेल तर कॅल्शिअम असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. त्या काही गोष्टी खालीलप्रमाणे सांगता येतील.
Calcium Deficiency: शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि खनिजांची गरज असते हे सगळ्यांनाच माहीत. वेगवेगळ्या खनिजांपैकी शरीरासाठी एक महत्वाचं असलेलं खनिज म्हणजे कॅल्शिअम. हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शिअम गरजेचं असतं. तसेच मसल्स, नर्व, हार्मोन फंक्शन आणि दातांसाठीही कॅल्शिअम फार महत्वाचं असतं. शरीरात जर कॅल्शिअम कमी झालं तर याचा थेट प्रभाव पडतो. आताच्या चुकीच्या लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे तर याचा अधिक जास्त प्रभाव दिसून येतो. हात-पायांमध्ये वेदना किंवा सतत अंगदुखी होत असेल तर कॅल्शिअम असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. त्या काही गोष्टी खालीलप्रमाणे सांगता येतील.
दूध आणि इतर डेअरी प्रोडक्ट
दूध आणि इतर डेअर प्रोडक्ट जसे की, दही-पनीर शरीराला भरपूर कॅल्शिअम देतात. या पदार्थांमध्ये कॅल्शिअमसोबतच प्रोटीनही भरपूर असतं जे हाडांसाठी फार फायदेशीर आहे.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या भाज्यांचे आपल्या आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के भरपूर असतात. यात आयर्न, फायबर आणि कॅल्शिअमही भरपूर असतं. खासकरून पालक आणि केळींमध्ये कॅल्शिअम भरपूर असतं.
सोया मिल्क
सोया मिल्क, सोया चंक्स आणि सोयाबीन सारख्या सोया प्रोडक्ट्समध्ये कॅल्शिअम भरपूर असतं. तसेच यांमध्ये व्हिटॅमिन डी सुद्धा भरपूर असतं. जे हाडांमध्ये फार महत्वाचं असतं.
बदाम
बदामात भरपूर कॅल्शिअम असतं म्हणून याला हाय कॅल्शिअम फूड मानलं जातं. यात प्रोटीनही भरपूर असतं. अशात हाडे मजबूत करण्यासाठी यांचं नेहमी सेवन केलं पाहिजे.
अंजीर
अंजीर असं फळ आहे ज्यात फायबर, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम भरपूर असतं. एक कप वाळलेल्या अंजीरमध्ये 242 mg कॅल्शियम असतं. तसेच यात मॅग्नेशिअमही भरपूर असतं. जे मसल्स मजूबत करतं.
संत्री
सामान्य संत्री व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी खाल्ली जातात. पण यात कॅल्शिअम सुद्धा भरपूर असतं. तसेच यातील व्हिटॅमिन डी कॅल्शिअमला चांगल्या पद्धतीने एब्जॉर्ब करण्यास मदत करतं.
बीया
चिया सीड्स, पॉपी सीड्स आणि तीळ अशा बीया ज्या शरीराला चांगलं कॅल्शिअम देतात. या बियांमध्ये फॉस्फोरस, मॅग्नेशिअम आणि फायदेशीर फॅटी अॅसिड्स असतात. त्यामुळे या बीया खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.