Omicron ला 'सौम्य' म्हणणे ही मोठी चूक, जगभरातील लोकांचा घेतोय जीव, WHO ने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 08:30 AM2022-01-07T08:30:35+5:302022-01-07T08:31:15+5:30
Omicron : ओमायक्रॉनमुळे जगभरातील लोकांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे त्याला सौम्य असल्याचे समजून दुर्लक्ष करू नका, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
जिनेव्हा : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टा (Delta) व्हेरिएंटपेक्षा कमी गंभीर असल्याचे म्हटले जाते होते. यामुळेच जगभरात लाखो जणांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत चेतावणी दिली आहे. ओमायक्रॉनमुळे जगभरातील लोकांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे त्याला सौम्य असल्याचे समजून दुर्लक्ष करू नका, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
विक्रमी संख्येने लोक नवीन व्हेरिएंटला बळी पडत आहेत. बर्याच देशांमध्ये ओमायक्रॉनचा वेग डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगवान आहे, म्हणजेच रुग्णालयात वेगाने रुग्ण दाखल होत आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसेस म्हणाले. याचबरोबर, ओमायक्रॉन डेल्टा पेक्षा कमी गंभीर असल्याचे दिसून येते, विशेषत: लसीकरण केलेल्या लोकांमध्ये. मात्र, याचा अर्थ असा नाही की तो सौम्य व्हेरिएंट म्हणून वर्गीकृत केले पाहिजे, असे टेड्रोस अधानोम घेब्रेयेसेस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले.
टेड्रोस अधानोम घेब्रेयेसेस यांनी स्पष्ट केले की, पूर्वीच्या व्हेरिएंटप्रमाणेच, ओमायक्रॉन लोकांना रुग्णालयात जाण्यास भाग पाडत आहे. तसेच, तो लोकांचा जीव घेत आहे. खरंतर त्सुनामीची प्रकरणे इतकी मोठी आणि वेगवान आहेत की, जगभरातील आरोग्य यंत्रणांवर त्याचा परिणाम होत आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या कोरोनाच्या आकडेवारीनुसार, 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या आठवड्यात जागतिक स्तरावर मागील आठवड्याच्या तुलनेत संसर्गाच्या नवीन प्रकरणांमध्ये 71 टक्के वाढ झाली आहे.