सरळ की उलटं, कसं धावल्याने लवकर वजन होईल कमी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 05:16 PM2024-08-28T17:16:02+5:302024-08-28T17:16:43+5:30

Backward Running : आज आम्ही तुम्हाला उलटं धावण्याचे फायदे सांगणार आहोत. एका शोधानुसार, उलटं धावल्याने वजन लवकर कमी करण्यास अधिक फायदा होतो. 

Can backward running loose your weight fast, know what says research | सरळ की उलटं, कसं धावल्याने लवकर वजन होईल कमी?

सरळ की उलटं, कसं धावल्याने लवकर वजन होईल कमी?

Backward Running : वजन कमी करण्यासाठी एक्सपर्ट वेगवेगळ्या एक्सरसाईज करण्याचा सल्ला देत असतात. त्यात धावणं आणि चालणं यांचाही समावेश असतो. जास्तीत जास्त लोक फीट राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी रोज धावायला जातात. धावण्याचे अनेक फायदेही तुम्हाला माहीत असतील. पण आज आम्ही तुम्हाला उलटं धावण्याचे फायदे सांगणार आहोत. एका शोधानुसार, उलटं धावल्याने वजन लवकर कमी करण्यास अधिक फायदा होतो. 

या रिसर्चमध्ये २६ महिलांना सहभागी करुन घेण्यात आले होते. या महिलांना जवळपास ६ आठवडे उलटं धावायला सांगण्यात आलं. यात ज्या महिला दररोज १५ ते ४५ मिनिटे सरळऐवजी उलटं धावत होत्या, त्या महिलांचं वजन २.५ टक्के कमी आढळलं. यूनिव्हर्सिटी ऑफ मिलान आणि कराडिफ यूनिव्हर्सिटीच्या काही अभ्यासकांचं म्हणनं आहे की, उलटं धावल्याने गुडघ्याची समस्याही कमी होते.

उलटं धावण्याचे फायदे

- सरळ धावताना लोक कंबर वाकवता. याने व्यक्तीला मान आणि पाठीचं दुखणं यांसारख्या समस्यांचा होऊ शकतात. त्याऐवजी उलटं धावण्यासाठी तुम्हाला जास्त ताठ रहावं लागतं आणि हीच स्थिती धावताना तुम्हाला कायम ठेवावी लागते. रोज धावणाऱ्यांचा मूड नेहमी चांगला राहतो. रोज धावणारे लोक दिवसभर मेहनत करुनही फ्रेश दिसतात.

- रिसर्चनुसार, उलटं धावल्याने तुम्हाला वजन लवकर कमी करण्यास मदत मिळते. कारण उलटं धावल्याने तुमच्या २० टक्के कॅलरी जास्त बर्न होतात. धावल्याने वेगवेगळ्या हृदयरोगांचाही धोका टाळता येऊ शकतो. तसेच तणावपूर्ण वातावरणात काम केल्यानंतर थोडं धावायला गेलात तुम्हाला फ्रेश वाटेल. 

- सरळ धावण्यापेक्षा उलटं धावण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते, म्हणून याने तुमच्या शरीराची क्षमताही वाढते. त्यासोबच सरळ धावल्याने तुमच्या मेंदूचं लक्ष आजूबाजूला जाऊ शकतं. पण उलटं धावत असल्याने तुमचा मेंदू त्यातच गुंतलेला असतो. त्यामुळे तुमची एकाग्रताही वाढते. 

- मेडिसन अ‍ॅंड सायन्स इन स्पोर्ट्स अ‍ॅट एक्सरसाईजच्या एका रिपोर्टमध्ये, दररोज जॉगिंग करणाऱ्या १ लाख लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जे दररोज २६.६ किमी चालतात, त्यांना अर्थारायटिसचा धोका कमी होतो. 

Web Title: Can backward running loose your weight fast, know what says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.