जांभळाच्या बियांनी किडनी स्टोनची समस्या दूर होते?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 11:02 AM2019-01-17T11:02:25+5:302019-01-17T11:03:58+5:30
किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा ही समस्या सामान्य आहे. पण याने होणारा त्रास हा असह्य असतो.
किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा ही समस्या सामान्य आहे. पण याने होणारा त्रास हा असह्य असतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी सामान्यपणे ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. पण काही प्रकरणांमध्ये काही औषधांनीही ही समस्या दूर होते. जांभळाच्या बियांनीही किडनी स्टोनची समस्या दूर होत असल्याची मान्यता आहे. आयुर्वेदात जांभळाच्या बियांचा वापर किडनी स्टोन दूर करण्यासाठी केला जातो. चला जाणून घेऊ याच्या वापराबद्दल....
जांभळाच्या बियांचा वापर करण्यासाठी तुम्हाला त्याची पावडर तयार करावी लागेल. आधी या बीया चांगल्याप्रकारे धुवा. त्यानंतर त्या उन्हात वाळत ठेवा. त्यानंतर त्याची साल काढून छोटे छोटे तुकडे करा आणि मिक्सरमधून त्यांची बारीक पावडर तयार करा. हे तयार पावडर एका बाटलीमध्ये किंवा डब्यामध्ये ठेवा.
जांभळाची बी ही मधुमेह रुग्णांसाठीही फायेदशीर मानली जाते. जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये जांभळाच्या बियांचं पावडर टाकून प्यायलात तर फायदा होऊ शकतो.
जर तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर जांभळाच्या बियांच्या पावडरचा वापर करा. रोज सकाळी आणि सायंकाळी कोमट पाण्यामध्ये १ चमचा पावडर टाकून सेवन करा. तुमची किडनी स्टोनची समस्या काही दिवसातच दूर होऊ शकते. पण हे करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.
महिलांना मासिक पाळीमध्ये जास्त स्त्राव किंवा वेदना होत असतील तर जांभळाच्या बियांच्या पावडरचं सेवन करण्यास सांगितलं जातं. मात्र हा उपाय सुद्धा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा. कारण प्रत्येकाची शरीर रचना ही वेगळी असते. त्यामुळे काहींना याचे साइडइफेक्टही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.