चहासोबत काजू खाऊ शकतो का?; अनेकांना माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 01:39 PM2024-08-13T13:39:25+5:302024-08-13T13:45:59+5:30

तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही चहासोबत खात असलेल्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतात की नुकसान करतात? त्याबाबत जाणून घेऊया...

can cashew be eaten with tea | चहासोबत काजू खाऊ शकतो का?; अनेकांना माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर

चहासोबत काजू खाऊ शकतो का?; अनेकांना माहीत नाही या प्रश्नाचं उत्तर

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहानेच होते. चहा आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक अँटीबॅक्टेरियल गोष्टी असतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो. चहासोबत आणखी काही खायला मिळालं तर ते अनेकांना जास्तच भारी वाटतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही चहासोबत खात असलेल्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतात की नुकसान करतात? त्याबाबत जाणून घेऊया...

बिस्किटं आणि स्नॅक्स व्यतिरिक्त लोक चहासोबत काजू आणि भजी देखील खातात. पण असं केल्याने तुमच्या आरोग्यालाही हानी पोहोचू शकते. अनेकदा घरांमध्ये पाहुण्यांना चहासोबत बिस्किटं किंवा इतर नाश्ता दिला जातो. पण चहासोबत असं काही खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

अनेक वेळा अशा प्रकारचे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्याने आरोग्याला गंभीर हानी पोहोचते. अनेकांना लेमन टी आवडतो. पण तुम्हाला माहीत आहे का की चहा पावडरसोबत जेव्हा लिंबू मिसळला जातो तेव्हा ते एसिडचं रूप घेतं. यामुळे तुमचं पोट खराब होऊ शकतं. चहासोबत अशा गोष्टी खाऊ नका, ज्यात जास्त हळद असेल. 

चहा आणि हळदीमध्ये असलेले रासायनिक घटक पचनसंस्थेला हानी पोहोचवू शकतात. चहासोबत काजू न खाण्याचाही सल्ला दिला जातो. आयर्नयुक्त पदार्थ दुधासोबत खाऊ नयेत. चहासोबत काजू, बदाम किंवा इतर ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने तुमचं आरोग्य बिघडू शकतं.
 

Web Title: can cashew be eaten with tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.