च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का? डॉक्टरांकडून जाणून घ्या सत्य....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 10:50 AM2024-08-24T10:50:01+5:302024-08-24T10:50:59+5:30
च्युइंगम खाल्ल्याने चेहरा बारीक होतो. यातील जास्तीत जास्त गोष्टी या गैरसमज असतात. अशात डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर अंकुर सरीन यांनी अशाच काही गैरसमजांबाबत माहिती दिल आहे.
Skin Care: लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं जातं की, पाणी प्यायल्याने त्वचेवर पुरळ येत नाही. तर कधी सांगितलं जातं की, च्युइंगम खाल्ल्याने चेहरा बारीक होतो. यातील जास्तीत जास्त गोष्टी या गैरसमज असतात. अशात डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर अंकुर सरीन यांनी अशाच काही गैरसमजांबाबत माहिती दिल आहे.
त्वचेसंबंधी काही गैरसमज
एक्नेसाठी पाणी
डर्मेटोलॉजिस्ट अंकुर यांच्यानुसार, पाणी प्यायल्याने त्वचेवरील एक्ने दूर होत नाहीत. पाणी प्यायल्याने त्वचेचं एकंदर आरोग्य चांगलं राहतं, पण याचा काही वैज्ञानिक पुरावा नाही की, पाणी प्यायल्याने एक्नेची समस्या दूर होते. एक्ने हार्मोनमध्ये बदल, बॅक्टेरिया, एक्सेस ऑईलचं प्रोडक्शन आणि क्लोग्ड पोर्समुळे होतात. हाइयड्रेटेड राहणं एकंदर पूर्ण त्वचेसाठी फायदेशीर असतं. याने त्वचेमध्ये ओलावा राहतो. पण एक्ने दूर करण्यासाठी हा काही ठोस उपाय नाही.
स्ट्रॉबेरी स्कीनची समस्या
हात-पाय किंवा शरीराच्या एखाद्या भागात अनावश्यक केस वाढतात तेव्हा स्ट्रॉबेरी स्कीन (Strawberry Skin) ची समस्या होते. स्ट्रॉबेरी स्कीनची समस्या तेव्हा होते जेव्हा त्वचेवर बारीक बारीक पुरळ दिसू लागते. आणि त्वचा रखरखीत होते. इनग्रोन हेअर म्हणजे अनावश्यक केस येण्याच्या समस्येचं मुख्य कारण हात-पायांवर शेव्हिंग करणं आहे. अशात स्ट्रॉबेरी स्कीनच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी असं सांगितलं जातं की, स्क्रब केल्याने त्वचा पूर्णपणे साफ होते. पण डॉक्टर सरीन सांगतात की, स्क्रब केल्यावर ही समस्या दूर होत नाही.
चेहरा बारीक करण्यासाठी च्युइंगम
बरेच लोक असा विचार करतात की, च्युइंगम खाल्ल्याने सुजलेला चेहरा बारीक होतो. मात्र, डर्मेटोलॉजिस्टनुसार फेशिअल मसल्सच्या एक्सरसाईजने चेहऱ्यावर दिसणारं फॅट कमी होत नाही. च्युइंगम चघळल्याने चेहरा बारीक होत नाही, उलट आणि जास्त रूंद दिसू शकतो.