कच्ची कडधान्य खाण्याचे होऊ शकतात वाईट परिणाम? काय सांगतात एक्सपर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 10:17 PM2021-06-25T22:17:08+5:302021-06-25T22:17:47+5:30

मोड आलेले धान्य अथवा स्प्राऊट्सआरोग्यासाठी उत्तम असतात. मोड आलेल्या धान्याला अंकुरित धान्य  असेही म्हणतात. अंकुरित धान्य पौष्टिक आणि चविष्ट लागतं मात्र, तुम्ही जर मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्लात तर त्याचे दुष्परिणामही आहेत.

Can eating raw cereals have bad consequences? What the experts say | कच्ची कडधान्य खाण्याचे होऊ शकतात वाईट परिणाम? काय सांगतात एक्सपर्ट

कच्ची कडधान्य खाण्याचे होऊ शकतात वाईट परिणाम? काय सांगतात एक्सपर्ट

googlenewsNext

मोड आलेले धान्य अथवा स्प्राऊट्सआरोग्यासाठी उत्तम असतात. मोड आलेल्या धान्याला अंकुरित धान्य  असेही म्हणतात. अंकुरित धान्य पौष्टिक आणि चविष्ट लागतं मात्र, तुम्ही जर मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्लात तर त्याचे दुष्परिणामही आहेत. डॉ. स्मिता सिन्हा यांनी ओन्लीमायहेल्थ वेबसाईटला मार्गदर्शन करताना याबाबत अधिक माहिती दिली आहे.

स्प्राऊट्स निवडताना कोणती काळजी घ्यावी?

  • धान्य भिजवताना ते  आधी व्यवस्थित निवडून घ्या
  • धान्यात भेसळ नसल्याची खात्री करून घ्या
  • धान्य भिजत ठेवण्यापूर्वी ते दोन ते तीन वेळी धुवून स्वच्छ करा
  • धान्य शिजवताना ते तेलात तळण्याऐवजी वाफेवर शिजवा. ज्यामुळे त्यातील पोषकतत्त्व नष्ट होणार नाहीत.
  • मोड आलेले धान्य जास्त दिवस ठेवून खाऊ नका
  • बाजारात विकत मिळणारे मोड आलेले धान्य खरेदी करण्याऐवजी घरातच धान्य भिजत ठेवून त्याला मोड आणा.

अंकुरित धान्य खाण्याचे दुष्परिणाम
अंकुरित धान्य जरी तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असले तरी कच्ची अंकुरित धान्य खाणे नक्कीच योग्य नाही. 

  • कच्ची अंकुरित धान्य खाण्यामुळे पोटात गॅस होतो
  • अपचन होण्याची शक्यता असते. 
  • जर तुम्हाला पित्त अथवा अॅसिडिटीचा त्रास असेल कच्ची अंकुरित धान्य मुळीच खाऊ नका.
  • छोटी मुलं, गर्भवती महिला किंवा वयोवृद्धांनी स्प्राऊट्स उकडूनच खावेत
  • काही डॉक्टरांच्या मते स्प्राऊट्समुळे फुड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते.
     

Web Title: Can eating raw cereals have bad consequences? What the experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.